मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी सोपे आणि प्रभावी आयुर्वेदिक उपाय

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी सोपे आणि प्रभावी आयुर्वेदिक उपाय

आयुर्वेदिक उपचार आणि औषधांमुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळू शकते.

आयुर्वेदिक उपचार आणि औषधांमुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळू शकते.

आयुर्वेदिक उपचार आणि औषधांमुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळू शकते.

  • myupchar
  • Last Updated :
कमकुवत आहार, कमी पाणी पिणं, मूळव्याध, पोटातील कमकुवत स्नायू, ताणतणाव, अनियमित शौच करण्याची सवय यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते. बद्धकोष्ठता म्हणजे आतड्यांमधील हालचालींमध्ये अडचण किंवा सामान्यापेक्षा कमी मलत्याग होणं. जेव्हा पचनतंत्र क्षीण होतं तेव्हा बद्धकोष्ठताची स्थिती उद्भवते. पचनात अडथळा आल्यामुळे एखादी व्यक्ती जे काही खाते ते पचवू शकत नाही. myupchar.com च्या एम्सशी संबंधित डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी यांनी सांगितलं, ज्या लोकांच्या आहारात भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. आयुर्वेदात बद्धकोष्ठतेच्या या समस्येला वात दोषाचं असंतुलन म्हटलं जातं. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल म्हणाले, वात दोषात असंतुलनामुळे बद्धकोष्ठता उद्भवते आणि यामुळे विषाक्त पदार्थ (अमा) आणि मल (पुरिष) आतड्यांमध्ये जमा होऊ लागतात. काही प्रकरणांमध्ये कफ आणि पित्तदोषांमुळेही बद्धकोष्ठता उद्भवू शकते. यामुळे पोटदुखी, डोक्यात तीव्र कळ, तहान, डोकेदुखी, वाहणारे नाक अशा समस्या उद्भवतात. अशक्तपणा, मूत्र आणि मलत्यागात अडचण, तीव्र वेदना अशा तक्रारी येऊ शकतात. आयुर्वेदात बद्धकोष्ठता नियंत्रित करण्यासाठी काही औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. आयुर्वेदिक उपचार करण्यापूर्वी बद्धकोष्ठतेचे कारण काय आहे याची तपासणी केली जाते.  आयुर्वेदिक उपचार किंवा बद्धकोष्ठतेच्या उपचारामध्ये वंगण, घाम येणं, उत्सर्जन आणि एनिमा यांचा समावेश आहे. हे वाचा - मधुमेही आणि किडनी स्टोन असलेल्यांसाठी औषध आहेत पळसाची फुलं; असा करा वापर वंगणमध्ये औषधी वनस्पतींनी भरलेल्या तेलानं मालिश केली जाते. बद्धकोष्ठतेचे कारण वात असल्यास हलकी मालिश करा. पित्तामुळे झालेल्या बद्धकोष्ठतेमध्ये सामान्य आणि कफने ग्रस्त व्यक्तीने खोल ऊतकांवर मालिश करावी.  स्वेदनमध्ये घाम येण्याच्या प्रक्रियेचा वापर करतात. ज्यामध्ये शेकणं, गरम वाफ घेणं किंवा औषधी गरम तेल ओतून मालिश करणं समाविष्ट आहे. ही पद्धत त्यांच्या ठिकाणाहून विष काढून टाकते आणि त्यांना द्रवात रूपांतरित करते. विरचन हे पंचकर्माचं एक तंत्र आहे ज्यामध्ये विविध औषधी वनस्पतींचा वापर करून आतड्यांच्या हालचालींद्वारे शरीर शुद्ध केलं जातं. हे मल बाहेर काढून असंतुलित दोषाला संतुलित करून बद्धकोष्ठता दूर करतं. बस्ती वास्तवात एनिमा थेरेपी आहे. वाताने ग्रस्त व्यक्तीसाठी हा गुणकारी उपाय आहे. एनिमामध्ये संपूर्ण आतड्या, मलद्वार आणि गुद्द्वार स्वच्छ करण्यासाठी कार्य करतं. हे वाचा - कॅन्सरवर उपचाराचा त्वचा आणि केसांवर परिणाम; रुग्णांनी अशी घ्यावी काळजी बद्धकोष्ठतेच्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींमध्ये हरिताकी, विभिताकी आणि एरंडेल यांचा समावेश आहे. ते पाचन तंत्र, प्रणाली, श्वसन आणि मलमूत्र प्रणालींवर कार्य करतं. त्याच्यामध्ये रेचक, प्रतिजैविक, अँथेलमिंटिक गुणधर्म आहेत. बद्धकोष्ठतेच्या आयुर्वेदिक औषधांमध्ये दशमूळ काढा, त्रिफळा, विश्वंदर चूर्ण, हिंगू त्रिगुणा तेल, अभयारिष्ट आणि इच्छाभेदी रास यांचा समावेश आहे. व्यक्तीची प्रकृती आणि कारण यावर अवलंबून वैद्यकीय व्यवस्था निवडली जाते. योग्य औषधे आणि रोगाचे निदान करण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - पचनसंस्थेचे विकार न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
First published:

Tags: Ayurved, Health

पुढील बातम्या