कॅन्सरवर उपचार घेताना, कॅन्सरच्या पेशी नष्ट करताना त्वचेच्या पेशी आणि केसांवरही विपरीत परिणाम होतो. कॅन्सर रुग्णांमध्ये त्वचेचा रंग बदलणं, कोरडेपणा, मुरुम, सूर्यप्रकाशाची संवेदनशीलता, खाज सुटणं, अॅलर्जी, हायपरपिग्मेन्टेशन, अलोपिसीया (केस गळणं), डोक्याच्या त्वचेला खाज, केस अकाली पांढरे होणे अशा समस्या उद्भवतात.
कर्करोगाच्या रुग्णांना सूर्यापासून संरक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. बाहेर जाताना नेहमीच एक चांगले एसपीएफ असलेलं सनस्क्रीन लावा. सनस्क्रीनमध्ये झिंक ऑक्साईड, टायटॅनियम डायऑक्साइड किंवा एव्होबेन्झोन असावे. बाहेर जाण्यापूर्वी टोपी, हातमोजे, संरक्षणात्मक चष्मा घाला. दर दोन तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावा.