रामजन्मभूमीवर बांधल्या जाणाऱ्या मंदिराचं यंदा भूमिपूजन झालं आणि त्यामुळेच अयोध्येची दिवाळी यंदा खास ठरणारी आहे.
अयोध्येच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी राम की पैडी इथे त्यांनी दिवे लावून केलं.
अयोध्येत शरयूच्या काठी शुक्रवारी संध्याकाळी 5.51 लाख मातीच्या पणत्या लावण्यात आल्या, त्याचा एरिअल व्ह्यू.
राम जन्मभूमीच्या या रामलल्लाची पूजा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झाली आणि दीपोत्सवाला प्रारंभ झाला.
रामजन्मभूमीवरच्या राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर अयोध्या आता मोठं पर्यटन केंद्र होण्याच्या वाटेवर आहे आणि शुक्रवारचा दीपोत्सव त्याचंच द्योतक ठरला.
हिमालयाच्या कुशीत सोनेरी किरणांच्या आणि चंदेरी सावलीत दिमाखानं उभ्या असलेल्या या पुरातन मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे.
हिमालयाच्या चमचमणाऱ्या पार्श्वभूमीवर लावलेले हे रंगीत दिवे मंदिराचं आणि परिसराचं सौंदर्य खुलवत होते.
केदारनाथ परिसरात नुकतीच बर्फवृष्टी होऊन गेली. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी हे असं स्वर्गीय दृश्य दिसत होतं.
उत्तर प्रदेशातलं शरयूकाठचं अयोध्या आणि उत्तराखंडचं हिमालयाच्या कुशीतलं केदारनाथ या फोटोंनी भारतीय दिवाळीचं एक कायम स्मरणात राहील असं चित्र उभं केलं आहे.