जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ढेकणांच्या त्रासापासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी, वाचा सविस्तर

ढेकणांच्या त्रासापासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी, वाचा सविस्तर

ढेकण

ढेकण

एखाद्या कामानिमित्त व्यक्ती जेव्हा शहराबाहेर जाते, त्यावेळी हॉटेल किंवा लॉजमध्ये थांबण्याशिवाय पर्याय नसतो. आजकाल हॉटेलमध्ये एक-दोन दिवस निवासासाठी जाण्याचा ट्रेंड बराच वाढला आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : एखाद्या कामानिमित्त व्यक्ती जेव्हा शहराबाहेर जाते, त्यावेळी हॉटेल किंवा लॉजमध्ये थांबण्याशिवाय पर्याय नसतो. आजकाल हॉटेलमध्ये एक-दोन दिवस निवासासाठी जाण्याचा ट्रेंड बराच वाढला आहे. परगावी गेलेले बहुतांशी लोक त्यांच्या बजेटनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन हॉटेल बुक करतात. वास्तविक पाहता घरी जशी सुविधा मिळते त्याप्रमाणे हॉटेलमध्येही तशीच सुविधा असेल याबद्दल खात्रीलायक सांगता येत नाही. अनेकदा हॉटेलच्या खोलीत ढेकूण निघाल्याचा अनुभव बऱ्याच जणांना येतो. हॉटेलच्या खोलीत ढेकणाचा त्रास असेल तर झोप मोडून पूर्ण रात्र खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे हॉटेलमध्ये गेल्यानंतर खोलीची तपासणी तुम्ही स्वतः करायला हवी. काळजीपूर्वक पाहिल्यास हॉटेलच्या खोलीत ढेकूण सहज दिसू शकतात. एखाद्या हॉटेलच्या खोलीत ढेकूण असतील तर ते निवासासाठी गेलेल्या व्यक्तीला फार महागात पडू शकतं. व्यक्तीच्या कपड्यांत किंवा त्यांच्या लगेज बॅगमध्ये ढेकूण लपू शकतात. त्यांच्या चावण्यामुळे अ‍ॅलर्जी किंवा इन्फेक्शन होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. अशी घ्यावी काळजी हॉटेलच्या रूममध्ये प्रवेश केल्यानंतर तेथील कुठल्याही वस्तूला स्पर्श करू नये. आपले लगेज काढण्याआधी खोली व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यावी. खोलीची व्यवस्थित पाहणी होईपर्यंत आपलं लगेज फरशीवरच ठेवायला हवं. हेही वाचा -  कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणजे काय? लक्षणे आणि प्रतिबंध करण्याचे उपाय जाणून घ्या बेड व्यवस्थित तपासून घ्या बहुतांशवेळा हॉटेलच्या खोलीतील बेडमध्ये ढेकूण असण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे बेडवरील गादी, उशी, चादर अशा सर्व ठिकाणी व्यवस्थित तपासणी करून घ्यावी. बेडवर ढेकणाची अंडीही असू शकतात. त्याचीही पाहणी करावी. सोफ्यावरही असू शकतात ढेकणं बेडची व्यवस्थित तपासणी केल्यानंतर सोफ्यावरही एक नजर टाकायला हवी. सोफ्याचं कुशन किंवा इतर ठिकाणी ढेकूण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोफ्यावर असणाऱ्या वस्तू बाजूला करून व्यवस्थितपणे तपासणी करून घ्यावी. कपाट आणि फर्निचर पाहा हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेजमधील कपडे किंवा इतर साहित्य कपाट किंवा तेथील फर्निचरवर ठेवले जाते. परंतु असं करण्याआधी कपाट किंवा फर्निचरवरही ढेकूण तर नाहीत ना याची खात्री करून घ्यायला हवी. कपाटातील प्रत्येक कप्प्यामध्ये व्यवस्थितरित्या तपासणी करून घ्यावी. बेडच्या शेजारी असणाऱ्या फर्निचरचीही पाहणी करावी. पडद्यांची तपासणी करावी खोलीत सर्वत्र पाहणी केल्यानंतर खिडकी किंवा दरवाजांना असणाऱ्या पडद्यांकडे दुर्लक्ष करू नये. पडदे तसेच खोलीतील इलेक्ट्रिक दिवे, घड्याळ, फोटो फ्रेम याच्या आसपासही ढेकूण नसल्याची खात्री करून घ्या. दरम्यान, हॉटेलमध्ये राहायला गेल्यानंतर बऱ्याचदा खोली पूर्णपणे स्वच्छ केलेली आहे असं वाटतं. परंतु प्रत्यक्षात मात्र ढेकूण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खोली व्यवस्थित पाहून खात्री करून घेणं व आवश्यकता असल्यास हॉटेल स्टाफकडून खोलीचं निर्जंतुकीकरण करून घेणं आवश्यक आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: lifestyle , tips
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात