जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / या कारणामुळे झालं शेन वॉर्नचं निधन; सगळ्यात आधी छातीत होतात वेदना, जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

या कारणामुळे झालं शेन वॉर्नचं निधन; सगळ्यात आधी छातीत होतात वेदना, जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

या कारणामुळे झालं शेन वॉर्नचं निधन; सगळ्यात आधी छातीत होतात वेदना, जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

दिग्गज क्रिकेटर आणि लेगस्पिनर शेन वॉर्नच्या (Shane Warne) मृत्यूचं कारण हृदयविकाराच्या झटका असल्याचं सांगितलं जात आहे. हृदयविकाराचा झटका (Heart Attack) अतिशय धोकादायक आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 05 मार्च : जगातील महान फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या शेन वॉर्नचं आकस्मिक निधन झालं (Australian cricketer Shane Warne). पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, वॉर्न मृत्यूच्या वेळी थायलंडमध्ये होता. वॉर्नच्या अचानक जाण्याने संपूर्ण क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. वृत्तानुसार त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला (Shane Warne Death Reason). शेन वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये 700 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. त्याने जगातील प्रत्येक मैदानावर आपल्या करिष्माई गोलंदाजीने ऑस्ट्रेलियासाठी सामना जिंकून देणारी कामगिरी केली. मीडिया रिपोर्ट्समध्ये दिग्गज क्रिकेटर आणि लेगस्पिनर शेन वॉर्नच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराच्या झटका असल्याचं सांगितलं जात आहे. हृदयविकाराचा झटका अतिशय धोकादायक आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. झी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे. काय आहे हार्ट अटॅक - (Heart attack) जॉन्स हॉपकिन्सच्या मते, हृदयविकाराच्या झटक्याचे वैद्यकीय नाव मायोकार्डियल इन्फेक्शन आहे. ज्यामध्ये हृदयाला ऑक्सिजन आणि रक्त वाहून नेणाऱ्या कोरोनरी आर्टरीमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन आणि रक्त मिळत नाही आणि ते खराब होऊ लागतात. शेन वॉर्न अचानक कोसळला अन्, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं; समोर आली ही माहिती… हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं - प्रत्येक रुग्णामध्ये हृदयविकाराची लक्षणं (Symptoms of Heart Attack) वेगवेगळी असू शकतात, असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. छातीत तीव्र वेदना घाम येणं श्वास घेण्यास त्रास उलटी किंवा अस्वस्थ वाटणं चक्कर येणं अचानक थकवा जाणवणं छातीच्या मध्यभागी काही मिनिटांसाठी तीव्र वेदना, जडपणा किंवा आकुंचन वेदना हृदयापासून खांदा, मान, हात आणि जबड्यापर्यंत पसरते हृदयाचा ठोका अधिक वाढणं किंवा मंद होणं हृदयविकाराच्या झटक्याची कारणं - हृदयविकाराचा झटका खूप धोकादायक आहे, ज्यामुळे जीवदेखील जाऊ शकतो. अलीकडेच अभिनेता पुनीत राजकुमार आणि सिद्धार्थ शुक्ला यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जॉन्स हॉपकिन्स यांच्या मते, हृदयविकाराच्या झटक्यामागे खालील कारणं असू शकतात. वाईट जीवनशैली उच्च रक्तदाब उच्च कोलेस्टरॉल हृदयरोगाचा कौटुंबिक इतिहास मधुमेह धूम्रपान आणि मद्यपान अत्यंत तणावात असणं

शेन वॉर्नला ‘या’ दोन बॉलिवूड अभिनेत्रींना करायचं होतं डेट; इच्छा राहिली अपूर्ण

डॉक्टरांची मदत कधी घ्यावी? हृदयविकाराची लक्षणं दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा. तुमच्या शरीरात सौम्य शारीरिक बदल दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जाण्याचा प्रयत्न करा. लक्षणं पाहून याला दुसरी समस्या समजू नका किंवा त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. हार्ट अटॅकपासून वाचण्याचे उपाय - तुम्हाला हृदयविकार असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. सकस आहार घ्या आणि वजन नियंत्रणात ठेवा दररोज धूम्रपान आणि व्यायाम करू नका जास्त ताण घेऊ नका तुम्हाला मधुमेह असल्यास, त्यासाठी सांगितलेली औषधे घ्या. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासत राहा. हृदयविकाराचा उपचार कसा केला जातो? हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णावर अँजिओप्लास्टी केली जाते. ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या उघडल्या जातात. वैद्यकीय भाषेत या रक्तवाहिन्यांना कोरोनरी आर्टरीज म्हणतात. हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक यांसारख्या समस्यांनंतर डॉक्टर अनेकदा अँजिओप्लास्टीचा अवलंब करतात. हा खूप चांगला उपचार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात