कंपाला, 25 डिसेंबर : आफ्रिकी देश युगांडातील 7 वर्षांचा कॅप्टन सध्या जगभरात चर्चिला जात आहे. सेसना पॅसेंजर विमानाचं तीन वेळा उड्डाण करून कॅप्टनने अनोखा कारनामा केला आहे. कॅप्टनचं खरं नाव ग्रॅहम शेमा आणि त्याचे रोल मॉडेल अमेरिकन व्यावसायिका एलन मस्क आहेत. विमान आणि उड्डाण करण्याच्या कलेविषयी आश्चर्यकारकरित्या मिळालेल्या माहितीमुळे ग्राहम यांना लोक ‘कॅप्टन’ म्हणून संबोधतात. केवळ 7 वर्षीय हा कॅप्टनने प्रशिक्षणार्थी म्हणून सेसनाच्या 172 विमानाचं आधीच उड्डाण केलं आहे. पायलट आणि अंतराळवीर होण्याचं स्वप्न आणि एक दिवस मंगळावर जाण्याची दांडगी इच्छा असल्याने त्यांने सांगितलं. ग्रॅहम म्हणतो की, माझे रोल मॉडेल एलोन मस्क आहेत. मला एलोन मस्क आवडतात कारण मला त्याच्याकडून अंतराळाबद्दलची माहिती हवी आहे आणि मला त्यांच्यासोबत अंतराळात जाण्याची इच्छा आहे. स्थानिक टीव्हीवर कॅप्टनची मुलाखत घेण्यात आली होती. जर्मनीचे राजदूत व देशाचे परिवहन मंत्री यांना भेटण्यासाठीही त्याला आमंत्रित करण्यात आलं. जेव्हा ग्रॅहमच्या इन्स्ट्रक्टरने युगांडाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानाबद्दल सांगण्यास सांगितले, तेव्हा एका सुरात त्याबद्दल सर्व माहिती दिली. याशिवाय त्याने एक सविस्तर घटनाही सांगितली. ही घटना युगांडाची राजधानी कंपाळाच्या हद्दीत घडली. घटनेच्या वेळी ग्रॅहम बाहेर खेळत होता आणि त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार पायलट होण्याचा किडा तेव्हापासून त्याच्या मुलाच्या मनात होता. ग्रॅहमच्या आईने सांगितलं की, या घटनेनंतरच मुलाने विमान कसे चालते हे शिकण्यास सुरुवात केली. त्यानंतर ग्रॅहमच्या आईने स्थानिक विमानचालन संस्थेशी संपर्क साधला आणि ग्रॅहमला घरी विमानाविषयी माहिती देण्यास सुरुवात केली. पाच महिन्यांनंतर ग्रॅहम प्रथमच उड्डाण करताना म्हणाला, असं वाटतंय की पक्षी आकाशात उडतोय…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







