जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / धक्कादायक! 'क्वारंटाइन'मुळेच झाला कोरोना; 18 हजार संक्रमित, 700 लोकांचा मृत्यू

धक्कादायक! 'क्वारंटाइन'मुळेच झाला कोरोना; 18 हजार संक्रमित, 700 लोकांचा मृत्यू

पुण्यात गुरुवारी दिवसभरात नवे 1764 रूग्ण आढळून आलेत तर 48 जणांचा मृत्यू झाला. तर  दिवसभरात 1188 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.

पुण्यात गुरुवारी दिवसभरात नवे 1764 रूग्ण आढळून आलेत तर 48 जणांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 1188 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.

कॅनबेरा, 28 सप्टेंबर : कोरोनाव्हायरसचा (coronavirus) प्रसार अधिक होऊ नये म्हणून इतर ठिकाणांहून आलेल्या लोकांना सर्वात आधी क्वारंटाइन (quarantine) केलं जातं. जेणेकरून त्यांना कोरोना असल्यास आणि काही दिवसांनी त्यांच्यामध्ये लक्षणं दिसू लागल्यास त्यांच्यावर उपचार होतील आणि त्यांच्यामार्फत कोरोना जास्त पसरणार नाही. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये हाच क्वारंटाइन प्रोग्राम (australia quarantine programme ) जीवघेणा ठरल्याचा आरोप केला जातो आहे. ऑस्ट्रेलियातील एका हॉटेलमधील क्वारंटाइन प्रोगामच मोठं संकट बनलं आहे. याप्रकरणी सध्या तपास सुरू आहे. या प्रोग्राममुळे 768 लोकांचा जीव गेला.

  • -MIN READ
  • Last Updated :

कॅनबेरा, 28 सप्टेंबर : कोरोनाव्हायरसचा (coronavirus) प्रसार अधिक होऊ नये म्हणून इतर ठिकाणांहून आलेल्या लोकांना सर्वात आधी क्वारंटाइन (quarantine) केलं जातं. जेणेकरून त्यांना कोरोना असल्यास आणि काही दिवसांनी त्यांच्यामध्ये लक्षणं दिसू लागल्यास त्यांच्यावर उपचार होतील आणि त्यांच्यामार्फत कोरोना जास्त पसरणार नाही. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये हाच क्वारंटाइन प्रोग्राम (australia quarantine programme ) जीवघेणा ठरल्याचा आरोप केला जातो आहे. ऑस्ट्रेलियातील एका हॉटेलमधील क्वारंटाइन प्रोगामच मोठं संकट बनलं आहे. याप्रकरणी सध्या तपास सुरू आहे. या प्रोग्राममुळे 768 लोकांचा जीव गेला. अशी धक्कादायक माहिती नुकत्याच झालेल्या सुनावणीत समोर आली. आज तक ने डेली मेलचा हवाला देत हे वृत्त दिलं आहे. क्वारंटाइन प्रोग्राममधील त्रुटींमुळे 18 हजार लोक संक्रमित झाल्याचं सांगितलं जातं आहे. रिपोर्टनुसार, हॉटेलमध्ये क्वारंटाइन प्रोग्राम सुरू करण्यात आला मात्र तो फारसा यशस्वी झाला नाही. त्याचे उलट परिमाण झाले आणि याला कारण म्हणजे क्वारंटाइन प्रोग्राममधील त्रुटी आहेत.  प्रोटेक्टिव्ह गिअरचा योग्य वापर झाला नाही. स्टाफला नीट प्रशिक्षण दिलं नाही, सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करण्यात आलं नाही, असा आरोप होतो आहे. इतकंच नव्हे तर हॉटेल क्वारंटाइन प्रोग्राममुळे मेलबर्नमध्ये कोरोनाची दुसरी लाट पसरली असा दावाही केला जातो आहे. हे वाचा -  माणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार सरकारने क्वारंटाइन प्राणाली तयार करण्यात घाई केली आणि त्यावर लक्ष ठेवण्यातही सरकार अपयशी ठरलं आहे, असं या प्रकरणी वकिलांनी तपास समितीला सांगितलं. त्यामुळे आता व्हिक्टोरियाचे प्रीमिअर डेनिअल माइकेल एन्ड्रूज यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. विरोधी नेते मायकेल ओ ब्रायन यांनी ही मागणी केली आहे. व्हिक्टोरियातील सार्वजनिक प्रशासनाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चूक असल्याचं ते म्हणाले. हे वाचा -  इतक्यात टळणार नाही कोरोनाचं संकट! फक्त दुसरी नाही तर तिसरी लाटही येणार-तज्ज्ञ याआधी आरोग्यमंत्री जेन्नी मिकाकोसयांना क्वारंटाइन प्रोग्रामसाठी जबाबदार धरलं. त्यानंतर शनिवारी त्यांनी राजीनामा दिला. हॉटेल क्वारंटाइन प्रोग्राममुळेच मे महिन्यात कोरोनाची प्रकरणं मोठ्या प्रमाणात पसरू लागली. 90 टक्के प्रकरणं या प्रोग्रामशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात