मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

वंध्यत्व असलेल्या पुरुषांसाठी वरदान ठरेल 'हे' तंत्रज्ञान

वंध्यत्व असलेल्या पुरुषांसाठी वरदान ठरेल 'हे' तंत्रज्ञान

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

अनेक विवाहित जोडप्यांना आरोग्यविषयक बाबींमुळे मूल होण्यात अडचणी येत आहेत. मूल होत नसल्याने अनेक जोडपी वैद्यकीय उपचारही घेतात; मात्र उपचारांमुळे खात्रीशीर यश मिळतंच असं नाही.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

गेल्या काही वर्षांत बदलती जीवनशैली, वाढते ताणतणाव, आहारात बदल आणि प्रदूषण आदी समस्यांमुळे पुरुषांमध्ये वंध्यत्वाची (Men Infertility) समस्या वाढत आहे. अनेक विवाहित जोडप्यांना आरोग्यविषयक बाबींमुळे मूल होण्यात अडचणी येत आहेत. मूल होत नसल्याने अनेक जोडपी वैद्यकीय उपचारही घेतात; मात्र उपचारांमुळे खात्रीशीर यश मिळतंच असं नाही. पुरुषांमधल्या वंध्यत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी इंट्रासायटोप्लाझ्मिक तंत्राचा (Intracytoplasmic Technic) वापर फायदेशीर ठरतो. या तंत्रात मायक्रोस्कोपच्या (Microscope) साह्याने उत्तम शुक्राणू निवडले जातात. 'आयव्हीएफ'पेक्षाही (IVF) हे तंत्र जास्त प्रभावी असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. 'डॉक्टर डॉट एनडीटीव्ही' या वेबसाइटवर याविषयीची माहिती दिली आहे.

एका निष्कर्षानुसार, 40 टक्के जोडप्यांना पुरुषांमधल्या वंध्यत्वामुळे मूल होण्यात अडचणी येतात. पुरुषांमधील वंध्यत्वाची समस्या इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI) या तंत्रामुळे दूर होऊ शकते.

इंट्रासायटोप्लाझ्मिक तंत्र प्रेग्नसी (Pregnancy Rate) घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरलं आहे. मायक्रोस्कोप मशीनच्या अर्थात सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने चांगले आणि कमकुवत शुक्राणू ओळखता येतात. या मायक्रोस्कोप मशीनमध्ये शुक्राणूचा आकार त्याच्या मूळ आकाराच्या तुलनेत मोठा दिसतो. त्यामुळे चांगले शुक्राणूच फलनासाठी वापरले जातात. त्यामुळेच या पद्धतीचे परिणाम आयव्हीएफ तंत्रापेक्षा चांगले असल्याचं दिसून आलं आहे.

(भरपूर चहा प्या आणि मृत्यूचा धोका कमी करा; वाचा फायदे)

ICSI तंत्रात मायक्रोमॅनिप्युलेटर मशीनद्वारे शुक्राणू (Sparm) आणि स्त्रीबीज यांचा संयोग घडवून आणला जातो. ही मिलन किंवा फलित प्रक्रिया मातेच्या शरीराबाहेर केली जाते. याचाच अर्थ गर्भधारणेची प्रारंभिक प्रक्रिया मातेच्या शरीराबाहेर पार पडते. त्यानंतर दोन दिवसांनी भ्रूण आईच्या गर्भाशयात सोडला जातो आणि गर्भधारणेची पुष्टी करण्यासाठी 14 दिवसांनंतर ब्लड टेस्ट केली जाते.

या संपूर्ण प्रक्रियेपूर्वी संबंधित महिलेला बीज तयार होण्यासाठी 10 ते 12 दिवस आधी हॉर्मोनल इंजेक्शन दिलं जातं. त्यानंतर तिच्या शरीरातून स्त्री-बीज काढलं जातं. त्याला ओव्हम पिक असं म्हटलं जातं. ही प्रक्रिया वेदनारहित असते. यानंतर पुरुषाचे शुक्राणू घेतले जातात. या पद्धतीला टेस्टिक्युलर बायोप्सी (Testicular biopsy) म्हणतात. यासाठी जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटांचा अवधी लागतो. या प्रक्रियेत पेशंटला भूल दिली जाते.

Intracytoplasmic morphologically selected sperm injection (IMSI) हा आयसीएसआय तंत्राचा पुढचा टप्पा असतो. या फरक इतकाच आहे, की आयएमएसआयमध्ये स्पर्मची निवड खूप काळजीपूर्वक केली जाते आणि पारंपारिक आयसीएसआय तंत्राच्या तुलनेत हे जास्त प्रभावी आहे. ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असते किंवा Abnormal असते त्यांना 'आयएमएसआय'मुळे फायदा होतो. 'आयसीएसआय'चा पुढचा प्रभावी टप्पा म्हणून 'आयएमएसआय'कडे (IMSI) पाहिलं जातं.

(महिलांनी रोज करावी ही 3 योगासनं, जिमशिवाय मिळेल स्लिम-ट्रिम लूक)

ज्या जोडप्यांना नैसर्गिकरीत्या मूल होऊ शकत नाही, ते आयव्हीएफ तंत्राचा वापर करतात. यामध्ये प्रभावी शुक्राणूंची निवड हा सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. अनेक वेळा पतीचे शुक्राणू परिणामकारक नसतात आणि शुक्राणूंची संख्या कमी असते. अशा परिस्थितीत तज्ज्ञ डॉक्टर मेडिकल मायक्रोस्कोपच्या माध्यमातून गर्भधारणा होण्यासाठी चांगले शुक्राणू कोणते हे शोधून काढतात. आयव्हीएफ तंत्रासाठी सुमारे 80,000 ते 1,00, 000 रुपयांपर्यंत खर्च येतो. इंट्रासायटोप्लाझ्मिक मॉर्फोलॉजी तंत्र अशा जोडप्यांसाठी योग्य ठरू शकतं, ज्यांना इतका खर्च करून प्रेग्नसीसाठी कोणताही धोका पत्करायचा नसेल.

First published:

Tags: Health Tips, Relationship tips