नवी दिल्ली, 12 मार्च : ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाला (Solar eclipse) विशेष महत्व असते. यंदा 2022 मध्ये दोन सूर्यग्रहण (Solar eclipse) होणार आहेत. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी होणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असेल. तर दुसरे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबरला होणार आहे. हे देखील आंशिक सूर्यग्रहण असेल. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology), वर्षातील पहिले सूर्यग्रहण मध्यरात्री 12:15 पासून सुरू होईल, जे 1 मे रोजी पहाटे 04:07 पर्यंत राहील. कोणत्या राशीत सूर्यग्रहण (Solar eclipse) होईल- हिंदुस्थान टाइम्स ने दिलेल्या बातमीनुसार, वर्षातील पहिले सूर्यग्रहण मेष (Aries) राशीत होणार आहे. भारतात अंशत: सूर्यग्रहण असल्यानं सुतक काल देशात वैध राहणार नाही. हे ग्रहण प्रशांत महासागर, अटलांटिक, अंटार्क्टिका आणि दक्षिण अमेरिकेच्या नैऋत्य भागात दिसणार आहे. सूर्याला जनक आणि आत्म्याचा कारक म्हटले जाते. सूर्यग्रहणाची स्थिती शुभ मानली जात नाही. ग्रहण लागल्यावर सूर्याला त्रास होतो, असे मानले जाते. त्यामुळे या काळात शुभ परिणाम कमी होतात. मात्र, तरीही ज्योतिषशास्त्राच्या मते 4 राशींवर सूर्यग्रहणाचा प्रभाव फलदायी ठरणार असून हे लोक मालामाल होऊ शकतात. 1. वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण शुभ असणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचे अपूर्ण काम पूर्ण होईल. तुम्ही कोणतेही काम कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. प्रवास लाभदायक ठरेल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी ही वेळ चांगली आहे. हे वाचा - आजार कित्येक उपाय फक्त एक; कडुलिंबाच्या पानांचा ज्युस यामुळे ठरतो गुणकारी 2. कर्क - वर्षातील पहिले सूर्यग्रहण कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. कामात यश मिळेल. मित्रांकडून लाभ मिळू शकतो. समाजात मान-सन्मान वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. 3. तूळ - तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण शुभ राहील. नोकरीच्या ठिकाणी लाभाची शक्यता राहील. नोकरीत अनेक संधी मिळतील. भागीदारीच्या कामात यश मिळेल. या दरम्यान तुम्ही ऑफिसमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करू शकाल. हे वाचा - High BP चा त्रास असणाऱ्यांनी घरच्या-घरी करा ही 3 योगासनं; दिसेल चांगला परिणाम 4. धनु- धनु राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत असेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना शुभ परिणाम मिळतील. परदेशातून नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. व्यापाऱ्यांनाही फायदा होण्याची शक्यता आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.