Home /News /lifestyle /

गावात वाढलेल्या या कन्येनं फडकवला सातासमुद्रापार झेंडा, मिळवला Mrs India Australia चा बहुमान!

गावात वाढलेल्या या कन्येनं फडकवला सातासमुद्रापार झेंडा, मिळवला Mrs India Australia चा बहुमान!

भारतातील नकाशावरही सापडणार नाही अशा लहान गावातल्या मुली तेजस्वी यश मिळवताना दिसतात. अशाच एका विदेशातील स्पर्धेत या पूर्वाश्रमीच्या ग्रामकन्येनं यश मिळवलं आहे.

    गोरखपूर, 3 जानेवारी : भारतातील नकाशावरही सापडणार नाही अशा लहान गावातल्या मुली तेजस्वी यश मिळवताना दिसतात. यातून त्यांच्या गावासह देशाचीही मान उंचावत असते. उत्तर प्रदेशातील (UP) गोरखपूर (Gorakhpur) इथल्या एका मुलीनंही असाच सन्मान देशाला मिळवून दिला आहे. गोरखपूर इथल्या अनुमेहा तोमर (Anumeha Tomar) हिनं 'मिसेस इंडिया ऑस्ट्रेलिया 2020' (Mrs India Australia) हा सन्मान मिळवला आहे. अनुमेहा हिनं तिचं शिक्षण गोरखपूरमध्येच पूर्ण केलं. दहावीचं शिक्षण तिनं एचपी चिल्ड्रन्स अकॅडेमीमधून आणि पदवी शिक्षण दीनदयाल उपाध्याय विश्वविद्यालयातून पूर्ण केलं. तिचं कुटुंब आजही गोरखपूर इथंच राहतं. हा सन्मान मिळवल्यानंतर अनुमेहा अतिशय आनंदित झाली. 'मिसेस इंडिया ऑस्ट्रेलिया या स्पर्धेचा फायनल राउंड 31 डिसेंबरच्या रात्री सिडनी (Sydney) इथं झाला. मिसेस इंडिया ऑस्ट्रेलिया स्पर्धेचं आयोजन 2001 पासून केलं जातं. यात 2020 साली असंख्य स्पर्धक सहभागी झाले होते. मात्र सगळ्यांना मागे टाकत अनुमेहा परिक्षकांवर सर्वाधिक प्रभाव टाकण्यात यशस्वी झाली. एका भव्य समारंभात तिला मिसेस इंडिया ऑस्ट्रेलियाचा मुकूट घालण्यात आला. अनुमेहा 2019 साली ऑस्ट्रेलियाला आली होती. तिला नेहमीच मॉडेलिंगचा छंद होता. त्यातूनच या स्पर्धेसाठी मेहनत करण्याचं तिनं ठरवलं. विवाहित असो, की अविवाहित, स्त्रियांनी आत्मनिर्भरच असलं पाहिजे हे तिचं मत आहे. अनुमेहाचा जन्म 1991 साली गोरखपूरमध्येच झाला. तिचे वडील आर्थोपेडिक सर्जन आहेत. आई शिक्षिका आहे. 29 वर्षीय अनुमेहानं अकाउंट्स आणि कॉमर्समध्ये एमबीए केलं आहे. भारतात सहा वर्षे रियल इस्टेट क्षेत्रात ती कार्यरत होती. आता ऑस्ट्रेलियात ती एका फायनान्स कंपनीत काम करते. अनुमेहाचे पती चार्टर्ड अकाउंटंट आहेत. अनुमेहा समाजमाध्यमांवरही अतिशय सक्रिय असते. विविध विषयांवर अतिशय रोखठोक मतं मांडण्यासाठी ती ओळखली जाते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Australia, Sydney, UP

    पुढील बातम्या