मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तळहातावरचा घाम पुसून पुसून वैताग आलाय? घरगुती उपाय करतील या समस्येपासून सुटका

तळहातावरचा घाम पुसून पुसून वैताग आलाय? घरगुती उपाय करतील या समस्येपासून सुटका

तुम्हालाही जर हा त्रास होत असेल तर ही बातमी वाचाच. आज आम्ही तुम्हाला तळहातांवर येणाऱ्या घामाची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. त्याच्या मदतीने तुमची या समस्येपासून सुटका होऊ शकते.

तुम्हालाही जर हा त्रास होत असेल तर ही बातमी वाचाच. आज आम्ही तुम्हाला तळहातांवर येणाऱ्या घामाची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. त्याच्या मदतीने तुमची या समस्येपासून सुटका होऊ शकते.

तुम्हालाही जर हा त्रास होत असेल तर ही बातमी वाचाच. आज आम्ही तुम्हाला तळहातांवर येणाऱ्या घामाची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. त्याच्या मदतीने तुमची या समस्येपासून सुटका होऊ शकते.

  उन्हाळ्यात घाम येणं (Sweating) ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, काही लोकांना शरीराच्या इतर भागांबरोबरच हातांच्या तळव्यांवर (palms) खूप घाम येतो. तळव्यांवर सतत घाम आल्याने या लोकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्हालाही जर हा त्रास होत असेल तर ही बातमी वाचाच. आज आम्ही तुम्हाला तळहातांवर येणाऱ्या घामाची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. त्याच्या मदतीने तुमची या समस्येपासून सुटका होऊ शकते.

  कच्च्या बटाट्याचा वापर -

  जर तुमच्या तळहातांवर खूप जास्त घाम येत असेल तर तुम्ही कच्च्या बटाट्याचा वापर करू शकता. यासाठी कच्च्या बटाट्याच्या स्लाईस (potato slice) कापून काही वेळ हातावर चोळा. तुम्ही बटाटा बारीक करून त्याचा पल्पही लावू शकता. बटाट्याचा वापर केल्यानंतर काही वेळ हात न धुता स्वच्छ आणि वाळलेल्या कपड्याने पुसून घ्या. काही दिवस सतत हा प्रयोग केल्यास तुमची समस्या दूर होईल.

  हे ही वाचा-AC च्या थंड हवेत दिवसरात्र राहात असाल; तर आधी हे वाचा..

  बेकिंग सोडा वापरा –

  हातांच्या तळव्यावर येणाऱ्या घामाच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा (baking soda) वापरू शकता. एक चमचा बेकिंग सोडा घ्या त्यात काही थेंब पाणी टाकून त्याची घट्ट पेस्ट करा. ही पेस्ट दोन्ही हातांच्या तळव्यांवर लावून 10 मिनीटे राहू द्या. त्यानंतर दोन्ही हात एकमेकांना चोळून सोडा काढून टाका आणि पाण्याने हात धुवून घ्या.

  टॅलकम पावडरचा वापर –

  तुम्ही टॅलकम पावडर (Talcum powder ) वापरून या समस्येपासून मुक्त होऊ शकता. दोन्ही हातांवर टॅलकम पावडर टाका आणि हात एकमेकांना नीट चोळून घ्या. त्यानंतर काही वेळ पावडर तसाच राहू द्या. जेव्हा तुम्हाला काही काम करायचे असेल तेव्हा हात धुवून घ्या.

  अल्कोहलचा वापर -

  तळहातांना खूप जास्त घाम येत असेल तर तुम्ही अल्कोहोलचा (alcohol) वापर करू शकता. कॉटन बॉल्स अल्कोहोलमध्ये बुडवून त्याने दोन्ही हातांचे तळवे नीट स्वच्छ करा. त्यानंतर दोन्ही हात एकमेकांना चोळून अल्कोहोल वाळू द्या. तुम्हाला काम नसेपर्यंत तुम्ही अल्कोहोल लावलेले हात पाण्याने धुवू नका.

  तुरटीचा वापर -

  हातांच्या तळव्यांना येणाऱ्या घामापासून सुटका करण्यासाठी तुम्ही तुरटीचा (Alum) वापर करू शकता. एक चम्मच तुरटी पावडर दोन ग्लास साध्या पाण्यात टाका आणि त्या पाण्याने दिवसातून दोन वेळा हात धुवा. असे केल्यास तुमच्या हातांच्या तळव्यांवर घाम येणं कमी होईल.

  First published: