जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / World Record : 30 सेकंदात काढले 36 प्राण्यांचे आवाज, बंगालमधल्या अवलियाचं जगभारत कौतुक

World Record : 30 सेकंदात काढले 36 प्राण्यांचे आवाज, बंगालमधल्या अवलियाचं जगभारत कौतुक

World Record : 30 सेकंदात काढले 36 प्राण्यांचे आवाज, बंगालमधल्या अवलियाचं जगभारत कौतुक

अम्रिताभ मोंडल असे या अवलियाचं नाव आहे. अम्रिताभ हे विविध प्राणी, पक्षी, वाद्ये यांचे आवाज हुबेहूब काढतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुर्शिदाबाद (प.बंगाल), 19 जानेवारी: जगात अशा काही व्यक्ती आहेत, ज्यांच्यामध्ये अंगभूत कला असतात. त्या व्यक्ती अगदी सहज त्या सादर करतात. त्यांच्यातली असामान्य कला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. पश्चिम बंगालमधल्या बेरहामपूरमधला (Berhampore, West Bengal) असाच एक अवलिया आहे, जो (Most Unique Animal Sound Made in Thirty Seconds) 30 सेकंदात 36 पक्ष्यांचे आवाज काढतो. हे ऐकून खरेच ते प्राणी किंवा पक्ष्याचेच आवाज आहेत की काय असं क्षणभर वाटतं. अम्रिताभ मोंडल (Amritabha Mondal) असे या अवलियाचं नाव आहे. अम्रिताभ हे विविध प्राणी, पक्षी, वाद्ये (animals, birds and machine sounds) यांचे आवाज हुबेहूब काढतात. त्यांनी एका अमेरिकन माणसाच्या नावावर असलेलं वर्ल्ड रेकॉर्ड मोडत अर्ध्या मिनिटात 3 डझन प्राण्यांचे आवाज काढले. कोणताही ब्रेक न घेता ते विविध आवाज सहज काढू शकतात.

             आश्चर्य! 4 हात आणि 4 पाय; भारतात जन्माला आलं असं विचित्र बाळ; डॉक्टर म्हणाले…

त्यांनी 30 सेकंदात आवाजाच्या जादूचा वर्ल्ड रेकॉर्ड केलं आहे. यापूर्वी 30 सेकंदात 28 प्राण्यांचा आवाज काढण्याचा रेकॉर्ड एका अमेरिकन नागरिकाच्या नावावर होता. हा रेकॉर्ड मोडून अम्रिताभ मोंडल यांनी 30 सेकंदात 36 प्राण्यांचा आवाज काढले आहेत.

जाहिरात

मेडल्स, सर्टिफिकेट्स आणि ट्रॉफी अम्रिताभ हे प्राणी आणि पक्ष्यांव्यतिरिक्त वाद्यांचे आवाजही काढतात. त्यामध्ये कार्यक्रमांमध्ये वाजवल्या जाणाऱ्या सनईचा आवाह तर अगदी हुबेहुब येतो. आवाज काढण्याच्या या कलेमुळे त्यांचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. या कामगिरीबद्दल (achievement) त्यांना अनेक ट्रॉफी, सर्टिफिकेट्स, मेडल्स मिळालेली आहेत. त्यामध्ये ब्राव्हो इंटरनॅशनल बूक ऑफ रेकॉर्ड्स, क्रेडेन्स बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, चॅँपियन बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, यूनिक बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुरस्कारांचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात