Home /News /lifestyle /

अद्भुत! शास्त्रज्ञांनी शोधले गुरूसारखे 3 Exoplanets, एक ग्रह ठरणार आपल्याच ताऱ्याचं भक्ष्य

अद्भुत! शास्त्रज्ञांनी शोधले गुरूसारखे 3 Exoplanets, एक ग्रह ठरणार आपल्याच ताऱ्याचं भक्ष्य

बाह्यग्रह म्हणजे एक्सोप्लॅनेटच्या शोधात असलेल्या या शास्त्रज्ञांनी तीन अभूतपूर्व ग्रह शोधले आहेत. हे तीन महाकाय ग्रह त्यांच्या ताऱ्याच्या अगदी जवळ आहेत.

मुंबई, 19 जानेवारी: ज्याप्रमाणे पृथ्वीच्या पोटात जगाच्या निर्मितीची अनेक रहस्य दडलेली आहेत, त्याचप्रमाणं आपल्या डोक्यावरील अवकाशामध्येही (Space) अनेक गुपितं दडलेली आहेत. अंतराळ संशोधक (Space researcher) अवकाशातील ही गुपितं शोधून काढण्याचं काम करत असतात. कधी-कधी काही अद्भुत गोष्टी त्यांच्या नजरेस पडतात. अमेरिकेतील काही खगोलशास्त्रज्ञांना (Astronomer) अशाच तीन अद्भुत गोष्टी आढळल्या आहेत. बाह्यग्रह म्हणजे एक्सोप्लॅनेटच्या शोधात असलेल्या या शास्त्रज्ञांनी तीन अभूतपूर्व ग्रह शोधले आहेत. हे तीन महाकाय ग्रह त्यांच्या ताऱ्याच्या अगदी जवळ आहेत. यातील एका ग्रहाला तर लवकरच त्याचा तारा गिळंकृत करू शकतो. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, नासाच्या (NASA) ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइटच्या (TESS) मदतीनं हे तीन बाह्यग्रह शोधण्यात आले आहेत. टेसनं आतापर्यंत आपल्या सौरमालेबाहेरचे हजारो ग्रह शोधले आहेत. एका ग्रहाला तारा करणार गिळंकृत हवाई युनिव्हर्सिटीतील इन्स्टिट्युट ऑफ अॅस्ट्रोनॉमीतील खगोलशास्त्रज्ञांच्या एका टीमनं अलीकडेच हे तीन ग्रह शोधून काढले आहेत. हे तिन्ही ग्रह त्यांच्या तार्‍याजवळ धोकादायकपणे प्रदक्षिणा घालत आहेत. या ग्रहांना TOI-2337b, TOI-4329b आणि TOI-2669b अशी नावं देण्यात आली आहेत. यापैकी, TOI-2337b हा ग्रह 1 दशलक्ष वर्षांनंतर त्याच्या ताऱ्याचा भक्ष्य ठरणार आहे. खगोलशास्त्रीय वेळेच्या दृष्टीने ही घटना खूपच लवकर होणार आहे. हे वाचा-ताजमहालापेक्षा 5 पट मोठा लघुग्रह येतोय पृथ्वीच्या दिशेनं, उरले अवघे काही तास...! नवीन माहिती मिळेल एका अॅस्ट्रोनॉमिकल जर्नलमध्ये तीन नवीन ग्रहांच्या शोधाची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. या संशोधनाचे प्रमुख, सॅम्युअल ग्रुनब्लाट (Samuel Grunblatt) यांनी सांगितलं की, हा शोध बाह्यग्रहांच्या अभ्यासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. काळाच्या ओघात ग्रह प्रणाली कशाप्रकारे विकसित होतात, याची माहिती या ग्रहांच्या निरीक्षणांतून मिळेल. केक वेधशाळेत झालं निरीक्षण संशोधकांनी हवाई येथील डब्ल्यूएम केक ऑब्झर्व्हेटरीच्या (W. M. Keck Observatory) हाय रिझोल्यूशन अॅशले स्पेक्ट्रोमीटर (HIRES) यंत्रांसह टेसमधील (TESS) डेटाचा अभ्यास केला. त्यानंतर या तीन ग्रहांच्या अस्तित्वाची माहिती जाहीर केली. संशोधकांनी सांगितलं की, या तिन्ही ग्रहांची प्रणाली आणि उत्पत्ती समजून घेण्यासाठी केकमधील निरीक्षणांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. यावरून आपल्याला आपल्या स्वतःच्या सौरमालेच्या अंताबद्दलही माहिती मिळण्यास मदत होऊ शकते. हे वाचा-आता 'तो' दिवस दूर नाही! रशियन शास्त्रज्ञांचं 'ग्रहांवरील मानवाच्या एकाकीपणावर' संशोधन गुरू ग्रहाप्रमाणे आहेत विशाल आतापर्यंत आपले शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ ताऱ्यांद्वारे ग्रह गिळण्याची प्रक्रिया पाहू शकलेले नाहीत. त्यामुळे या तीन ग्रहांपैकी प्रथम गिळल्या जाणाऱ्या ग्रहाबाबत शास्त्रज्ञ जास्त उत्सुक आहे. संशोधकांना आशा आहे की ते टेसच्या (TESS) माध्यमातून असे हजारो ग्रह शोधतील. जेणेकरुन ते ग्रह एकमेकांशी आणि त्यांच्या ताऱ्यांशी कसे संवाद साधतात, मोठे होतात, तार्‍याभोवती कसे फिरतात आणि शेवटी त्यांच्यात कसे विलीन होतात याची माहिती मिळेल. संशोधकांना असंही आढळून आलं आहे की, या ग्रहांचं वजन गुरू (Jupiter) ग्रहाच्या वस्तुमानाच्या 0.5 ते 1.7 पट असू शकतं. आकार आणि घनता अभ्यासात असं सांगण्यात आलं आहे की, यातील सर्वांत लहान ग्रह गुरू ग्रहाच्या आकारापेक्षा किंचित लहान आहे तर सर्वांत मोठा ग्रह 1.6 पट आहे. त्यांची घनतादेखील खूप वेगळी आहे. कॉर्कच्या घनतेपासून ते पाण्याच्या घनतेच्या तिप्पट, या प्रमाणात या ग्रहांची घनता आहे. सध्या सुरू असलेल्या अभ्यासांमुळे ग्रह प्रणालींचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्याविषयी बरीच माहिती मिळू शकते. विश्वामध्ये इतरत्र जीवसृष्टी आहे की नाही याचादेखील उलगडा होण्यास मदत होईल. टक्कर किंवा विलीनीकरण कसं होईल? आतापर्यंतच्या विश्लेषणातून असं निदर्शनास आलं आहे की, हे ग्रह त्यांच्या ताऱ्याच्या विकास प्रक्रियेदरम्यान सर्पिलाकारात त्यामध्ये विलीन होतील. या प्रक्रियेत ग्रहांचं तापमान वाढेल आणि त्यांचं वातावरणही नष्ट होऊन जाईल. यामुळं ग्रह ताऱ्याच्या जवळ येतील व ज्यामुळे त्यांची टक्कर होण्याची शक्यता वाढेल. यामुळे त्यांची संपूर्ण ग्रह प्रणाली अस्थिर होऊ शकते. हा प्रकार त्या ताऱ्याच्या आयुष्यातील शेवटचा 10 टक्के कालावधी शिल्लक असताना होईल. संशोधकांनी सांगितलं की, भविष्यात जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमधून (James Webb Space Telescope) नवीन डेटा देखील उपलब्ध होईल. ज्यामुळं नव्याने सापडलेल्या ग्रहांबद्दल अधिक माहिती मिळेल. आतापर्यंत, दुर्बिणीच्या साहाय्याने केलेले सर्व अभ्यास, पृथ्वीबाहेरील वातावरणाविषयी फारशी माहिती देऊ शकले नाहीत. पण जेम्स वेब दुर्बिणीमुळे त्यांच्या वातावरणाची सविस्तर माहिती मिळू शकते.
First published:

Tags: Space, Space star

पुढील बातम्या