नवी दिल्ली, 27 डिसेंबर : दारू प्यायल्यानंतर व्यक्तीच्या एकूण वर्तनात बदल होत असल्याचं तुम्ही अनेकदा बघितलं असेल. विशेषत: ज्या व्यक्ती दारू पितात, त्यांना याबाबत जास्त माहिती असेल. दारू प्यायल्यानंतर काही काळ काहीही होत नाही. पण, काही वेळाने दारू पिणाऱ्याचा आवाज बदलू लागतो. त्या व्यक्तीला चालताना अडचण येते आणि हळूहळू शरीरावरील नियंत्रण सुटू लागतं. असं का घडतं, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अल्कोहोल काही काळानंतर परिणाम का दाखवू लागतं? दारू प्यायल्यानंतर शरीरात असं काय होतं की हे आपल्याला बदल दिसतात? ‘एबीपी न्यूज’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
अल्कोहोलचा एक घोट प्यायल्याबरोबर ते आपल्या शरीरात प्रवेश करतं. त्यानंतर लगेच त्याचा प्रभाव पडणं सुरू होतं. दारूमध्ये अल्कोहोल हा घटक असतो, हे सर्वांना माहीत आहे. अल्कोहोल पोटात गेल्यावर सर्वांत अगोदर ते गॅस्ट्रिक अॅसिड तयार करतं. त्यामुळे पोटातील म्युकस लाईनमध्ये जळजळ होते. यानंतर आपली आतडी अल्कोहोल शोषण्यास सुरुवात करतात. त्यानंतर विंगच्या माध्यमातून अल्कोहोल लिव्हरपर्यंत पोहोचतं. लिव्हर आतड्यांच्या अगदी जवळ असतं. त्यामुळे अल्कोहोल पोटातून थेट लिव्हरपर्यंत पोहोचण्याची शक्यता खूप जास्त असते.
हे ही वाचा : 'हे' परफ्युम विकत घेण्यासाठी विकावं लागेल घर, किंमत ऐकून डोक्याला येतील मुंग्या
विविध रिपोर्ट्सनुसार, दारू प्यायल्यानंतर 72 तासांपर्यंत आपल्या शरीरात अल्कोहोलचं प्रमाण राहतं. अल्कोहोल तुमच्या शरीरात किती काळ टिकेल ही बाब, दारूतील अल्कोहोलचं प्रमाण, अल्कोहोलची गुणवत्ता, दारू पिण्याची पद्धत इत्यादींवर अवलंबून असतं. या शिवाय अल्कोहोल चाचणी कोणत्या पद्धतीनं होते त्यानुसारदेखील शरीरातील अल्कोहोलचं प्रमाण भिन्न आढळतं.
डीडब्ल्यूच्या रिपोर्ट्सनुसार, आपलं लिव्हर मोठ्या प्रमाणात अल्कोहोल नष्ट करतं आणि शरीरावर होणारे परिणाम कमी करतं. यासाठी लिव्हरला खूप मेहनत करावी लागते. पण, दारूतील जे घटक लिव्हर नष्ट करू शकत नाही ते घटक मेंदूपर्यंत पोहोचतात. त्यानंतर काही मिनिटांतच मेंदूवर त्यांचा परिणाम होऊ लागतो. अल्कोहोल व्यक्तीच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवरदेखील परिणाम करतं. मज्जासंस्थेच्या कनेक्शनमध्ये बिघाड होतो आणि त्यानंतर पेशी अतिशय मंदपणे काम करू लागतात. मेंदूसुद्धा या परिस्थितीचा सामना करू शकत नाही. मेंदूच्या मध्यभागीदेखील अल्कोहोलचा परिणाम होतो. परिणामी, दारू प्यायलेली व्यक्ती स्वतःवरील नियंत्रण गमावते.
हे ही वाचा : Christmas 2022 : ख्रिसमस साजरा करण्याच्या 'या' अनोख्या प्रथा तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर
सुमारे सहा तासांपर्यंतच रक्त तपासणीद्वारे शरीरातील अल्कोहोलचं प्रमाण तपासता येतं. त्यानंतर रक्तातील अल्कोहोल शोधणं कठीण जातं. याशिवाय श्वासोच्छवासाची चाचणीच्या माध्यमातून 12 ते 24 तासांपर्यंत शरीरातील अल्कोहोलचं शोधता येतं. याशिवाय दारू प्यायल्यानंतर 72 तासांपर्यंत मानवी लघवीमध्ये अल्कोहोलचा अंश आढळतो. लाळेची चाचणी केली तर 12 ते 14 तासांपर्यंत शरीरातील अल्कोहोलचे अंश शोधता येतात. अशाप्रकारे चाचणीच्या वेगवेगळ्या पद्धती शरीरातील अल्कोहोलचं प्रमाण किती आहे ते सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alcohol