जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 'हे' परफ्युम विकत घेण्यासाठी विकावं लागेल घर, किंमत ऐकून डोक्याला येतील मुंग्या

'हे' परफ्युम विकत घेण्यासाठी विकावं लागेल घर, किंमत ऐकून डोक्याला येतील मुंग्या

परफ्युम

परफ्युम

परफ्युमचा दर्जा त्याचा सुगंध यानुसार त्याची किंमत ठरते. दुसरा मुद्दा असा की त्याचा सुगंध किता काळ टिकतो हे पण महत्त्वाचं आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 27 डिसेंबर :    तुम्ही एखाद्या लग्न समारंभात किंवा पार्टीत आहात असं समजा. तिथं अनेक मुली-महिला, मुलं-पुरूष नवनवे कपडे परिधान करून आलेले आहेत. अर्थातच प्रत्येकाची इच्छा आहे, की आपला ड्रेस इतरांपेक्षा वेगळा असावा आणि उठून दिसावा. तसे सगळ्यांचेच लग्नासाठीचे नवे कपडे आहेत; पण एका मुलीची मात्र सगळीकडेच चर्चा आहे आणि तीच सगळ्यांना आकर्षित करून घेतीए, असं घडलं तर तिच्याकडे काय वेगळं आहे याचा शोध तुम्ही आणि अनेकजणही घेतील. शोधल्यावर लक्षात येईल की तिनी खूपच आकर्षक असं परफ्युम लावलंय, त्यामुळे ती सगळ्यांनाच आकर्षित करतीए आणि एवढ्या लगीनघाईतही तिचं वेगळेपण मिरवते आहे. हे सांगण्याचं कारण असं की सुंदर कपडे, मेक-अप याबरोबरच त्या कपड्यांवर परफ्युम लावला तर तुमचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक वाटू शकतं. तो सुगंध त्या वातावरणात भरून राहतो आणि अनेकांना भुरळ घालतो. महागात महाग परफ्युम किती रुपयांचं असू शकतं हा विचार कधी केला आहे का?, पण कोट्यवधी रुपयांचं परफ्युमही जगात आहे. तुम्ही पाहिलेल्या परफ्युमच्या किमती काही शे रुपयांपासून अगदी काही हजारांपर्यंत असू शकतात पण कोट्यवधी रुपयांचं परफ्युम म्हटलं तर पटणार नाही. परफ्युमचा दर्जा त्याचा सुगंध यानुसार त्याची किंमत ठरते. दुसरा मुद्दा असा की त्याचा सुगंध किता काळ टिकतो हे पण महत्त्वाचं आहे. बाजारात अशी काही परफ्युम उपलब्ध आहेत जी घेण्यासाठी तुम्ही घर विकलंत तरीही पैसे उभारू शकणार नाही. हेही वाचा -  Christmas 2022 : ख्रिसमस साजरा करण्याच्या ‘या’ अनोख्या प्रथा तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर दुबईत Shumukh नावाचं परफ्युम मिळतं त्याची किंमत आहे 10 कोटी रुपये. या परफ्युमच्या बाटलीवर सर्वाधिक हिरे जडवण्यात आले आहेत असं गीनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड या परफ्युमच्या नावे नोंदवलं गेलं आहे. अंगावर 12 तास या परफ्युमचा सुगंध टिकतो. कपड्यांवर जर हे Shumukh परफ्युम लावलंत तर तो सुगंध 30 दिवस टिकतो. क्लिव्ह ख्रिश्चन Clive Christian ही सर्वोत्तम परफ्युम तयार करणाऱ्या जगातील नामांकित कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. तिने जगातलं सगळ्यात महागडं परफ्युम तयार केलं आहे. दुसरी प्रसिद्ध कंपनी Roja Dove ने तयार केलेलं परफ्युम Baccarat क्रिस्टल बॉटलमध्ये पॅक केलं जातं आणि त्याची किंमत 9.8 लाख रुपये आहे. DKNY Golden Delicious नावाचं परफ्युम. सामाजिक कार्याला मदत करण्यासाठी या फरफ्युमची एकच बाटली तयार केली होती. ती तयार करण्यासाठी 1500 तास लागले होते. त्या बाटलीवर 2,909 मौल्यवान रत्नं, 2,700 पांढरे हिरे, 183 पिवळी नीलम रत्न लावून ती सजवण्यात आली होती. हे परफ्युम 7.7 कोटी रुपयांना विक्रीला उपलब्ध होतं. क्लिव्ह ख्रिश्चन Clive Christian कंपनीने 2001 मध्ये No.1 नावाचं परफ्युम तयार केलं होतं. ते महिला-पुरूष दोघांना वापरता येणार होतं. त्याची किंमत तेव्हा 1.6 लाख रुपये होती. अशीही परफ्युम्सची दुनिया आहे. परफ्युमच्या किमती पाहिल्यावर लक्षात आलंच असेल की ही महागडी परफ्युम विकत घेणं आपलं काम नाही; पण पुढच्या वेळी लग्नात जाताना इतकं महाग नाही तर तुमच्या आवडीचं आणि परवडेल असं परफ्युम मारून जायला मात्र विसरू नका.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: lifestyle
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात