Home /News /lifestyle /

जरा प्रदूषण कमी झालं तर आणखी वाढेल तुमच्या मुलांची स्मरणशक्ती - Nitrogen Dioxide बद्दल नवा शोध

जरा प्रदूषण कमी झालं तर आणखी वाढेल तुमच्या मुलांची स्मरणशक्ती - Nitrogen Dioxide बद्दल नवा शोध

प्रमुख ( POLLUTANT) नायट्रोजन डायऑक्साईड (NO2) बाबत नवं संशोधन प्रसिद्ध झालं आहे आणि शाळेबाहेरचं प्रदूषण कमी झालं तर मुलं किती इयत्ता पुढे जातील, असं थेट गणित शास्त्रज्ञांनी मांडलं आहे.

    लंडन, 9 ऑक्टोबर : वायू प्रदूषणाने (Air pollution) श्वासाचे विकार होतात हे माहीत आहे. पण हवेतल्या घातक प्रदूषकांचा (Pollutants) थेट विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होत असतो, असं एका नव्या संशोधनातून शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे. Nitrogen Dioxide या प्रदूषणामुळे पसरणाऱ्या वायूचा लहान मुलांच्या स्मरणशक्ती, मानसिक वाढ, बुद्धिमत्तेवरही गंभीर परिणाम होत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. वातावरणातील प्रामुख्याने नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण जर घटलं तर लहान मुलांची शिकण्याची क्षमता 6 .1टक्क्यांनी वाढेल, असं  इंग्लंडमधील मँचेस्टर विद्यापीठातील हवामानतज्ज्ञ प्राध्यापक मार्टी व्हॅन टाँगरन यांनी म्हटलं आहे. शाळेजवळच्या वायू प्रदूषणात 20 टक्क्यांनी जरी घट झाली तरी त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती 6.1 टक्क्यांनी वाढू शकते. या हिशोबाने मुलं एक पंचमांश कमी प्रदूषणात शाळेत जायला लागली, तर त्यांचा सगळा अभ्यास एक महिना आधीच पूर्ण करता येऊ शकण्याएवढी क्षमता त्यांच्यात येईल, असं या अभ्यासातून दिसून आलं आहे. प्रामुख्याने ब्रिटिश शाळेतल्या विद्यार्थ्यांचा या संशोधनासाठी अभ्यास करण्यात आला. डेली मेलच्या बातमीनुसार, इंग्लंडच्या मँचेस्टर विद्यापीठातील तज्ज्ञांच्या मते, प्रदूषित हवेतला नायट्रोजन डायऑक्साईड मुलांच्या बुद्धिमत्ता वाढीत अडथळा आणत असतो. शाळेच्या आजुबाजूला हे प्रदूषण कमी असलं तरी मुलांची स्मरणशक्ती वाढते, असं या युनिव्हर्सिटीतल्या तज्ज्ञ अभ्यासकांनी सिद्ध केलं आहे. प्रदूषण कमी असेल तर शाळेय वयातल्या मुलांची शिक्षण घेण्याची क्षमता वाढते, ती वाढवा आणि त्यांना एक महिना पुढे ठेवा, असं एका स्पॅनिश अभ्यासातून लक्षात आल्याचंही संशोधकांचं म्हणणं आहे. वाहनातून निघणाऱ्या धुराचा परिणाम वाहनातून निघणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साइडमुळे वायू प्रदूषण होतं. याला जर आपण कमी केलं तर आपल्याच मुलांचा फायदा आहे. हे संशोधन विशेषत: नायट्रोजन डायऑक्साईडच्या बाबतीत आहे, जो कारखान्यातली धुराडी, वाहनांमधून होणारं प्रदूषण यामुळे हवेत पसरतो. प्रदूषणाचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो, त्यामुळे या आव्हांनाचा सामना करण्यासाठी स्थानिक सरकारांनी धोरण आखणं अत्यंत गरजेचे असल्याचं त्यांनी म्हटले आहे. मेंदूच्या विकासात प्रदूषणामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात. ब्रिटिश विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा या संशोधनात अभ्यास करण्यात आलेला नसला तरी स्पेनमध्ये जी मुले शाळेच्या बाहेर असलेल्या प्रदूषणाच्या संपर्कात आलेले आहे. त्यांच्यावरील अभ्यासातून संशोधकांनी हे निष्कर्ष काढले आहेत. या स्पॅनिश अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार शाळांच्या परिसरातील प्रदूषणाची पातळी २० टक्क्यांनी घटल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची स्मरणशकती वाढते.  शिवाय गर्भवती महिला प्रदूषणाच्या संपर्कात आल्यास बाळाच्या मेंदूच्या विकासावर तसेच त्याच्या आयुष्यभरावर हे प्रदूषण गंभीर परिणाम करू शकतं, असंही वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Pollution

    पुढील बातम्या