जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / OMG! या गोड चिमुकलीचं नाजूक शरीर हळूहळू बनतंय 'दगड'; भयानक आजाराने ग्रासलं

OMG! या गोड चिमुकलीचं नाजूक शरीर हळूहळू बनतंय 'दगड'; भयानक आजाराने ग्रासलं

OMG! या गोड चिमुकलीचं नाजूक शरीर हळूहळू बनतंय 'दगड'; भयानक आजाराने ग्रासलं

दुर्दैव म्हणजे शरीराला दगड बनवणाऱ्या (Girls Body Turning to Stone) या दुर्मिळ आजारावर उपचारही उपलब्ध नाही आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

ब्रिटन, 02 जुलै: या फोटोत गोड हसणारी ही चिमुकली अवघ्या 5 महिन्यांची आहे. लेक्सी रॅबिन्स  (Lexi Robins) असं तिचं नाव. 31 जानेवारीला तिचा जन्म झाला. तिच्या जन्मानंतर तिचे आईवडील आणि तिचं कुटुंब खूप आनंदी झालं. पण हा आनंद अवघ्या काही दिवसांपुरताच. जन्मानंतर काही दिवसांत लेक्सीला अशा आजाराचं निदान झालं, ज्यामुळे तिचं शरीर दगड बनत चाललं आहे (Girls Body Turning to Stone) आणि दुर्दैव म्हणजे या आजारावर उपचारच उपलब्ध नाही (Very Rare incurable condition) आहेत. लेक्सी रॅबिन्स  इतर मुलांप्रमाणेच हेल्दी, हसतखेळत होती. एप्रिलमध्ये तिच्या पालकांना ही समस्या दिसून आली. तिच्या पायाला Bunious होतं आणि हाताच्या अंगठ्यालाही डबल ज्वाइंट होतं.  त्यानंतर तिला तात्काळ डॉक्टरांकडे नेण्यात आलं.  तपासणी केल्यानंतर तिला फाइब्रोडिस्प्लेशिया ऑसिफिशियन्स प्रोग्रेसिव्हा (Fibrodysplasia Ossificans Progressiva)  हा आजार असल्याचं निदान झालं. हे वाचा -  एका घड्याळामुळे टळली त्याची वाईट वेळ; Smartwatch ने वाचवला जीव हा एक दुर्मिळ असा जेनेटिक डिसऑर्डर आहे. या आजारामुळे तिच्या शरीरात हाडांचा विकास जास्त होऊ लागला. शरीरातील स्नायू आणि पेशी नष्ट होऊ लागतात आणि त्यांची जागा हाडं घेतात. याचा अर्थ तिला कोणतीही लस किंवा इंजेरक्शन घेता येणार नाही. तिचे दात काम करणार नाही. कानाचं हाड वाढल्याने ती बहिरीसुद्धा होऊ सकते. तिच्या हातापायांची हालचालही थांबू शकते. डॉक्टरांनी सांगितलं की कदाचित मुलगी चालूफिरूही शकणार नाही. हे वाचा -  जे वाटलं सुंदर ते निघालं डेंजर! फुलाचा सुगंध घेताच गायिकेची झाली भयंकर अवस्था तिच्या पालकांनी तिला सर्वात तज्ज्ञ डॉक्टरांनाही दाखवलं. त्यांनी सांगितलं आपल्या तीस वर्षांच्या करिअरमध्ये आपण असं प्रकरण कझीच पाहिलं नाही. त्यातही दुर्दैव म्हणजे या आजारावर कोणताही उपचार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात