नवी दिल्ली, 11 जानेवारी : आधुनिक संवाद तंत्रज्ञानामुळं (modern communication technology) अनेक फायदे मिळाले आणि जगणं सोपं झालं. मात्र या तंत्रज्ञानामुळं तितकेच धोकेसुद्धा वाढले. दिल्लीत (Delhi) एक असाच प्रकार समोर आला आहे.
दिल्लीमध्ये एका मुलाच्या ऑनलाईन क्लासमध्ये (online class) हा प्रकार घडला. या मुलाच्या व्हॉट्सप ग्रुपमध्ये एक पॉर्न व्हीडिओ (porn video) पाठवलेला दिसला. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली. हा व्हीडिओ एका पालकाकडून (parents) व्हॉट्सअप ग्रुपवर (whats app group) पाठवला गेल्याचं सांगितलं जात आहे.
विशेष म्हणजे आजवर अनेक शाळांकडून अशाप्रकारच्या कृत्यांची तक्रार आली आहे. उत्तर दिल्ली महापालिकेनं अशा पालकांना खडसावलं आहे आणि यानंतर अशी चूक झाली तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे.
'आज तक'नं दिलेल्या वृत्तानुसार, जहांगीरपुरी इथं एका शाळेतील मुख्याध्यापकानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं, की 'आम्हाला मागच्या महिन्यात पाचवीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक अश्लील व्हीडिओ क्लिप (porn video clip) दिसली. आम्ही विद्यार्थ्याच्या पालकांना बोलावलं. त्यांनी मात्र असा कुठला व्हीडिओ पाठवल्याची गोष्ट अमान्य केली.
ते पुढं म्हणाले, 'शिक्षक या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये नियमित मेसेजेस पाठवतात. या मेसेजेसमध्ये विनंती केलेली असते, की आई-वडिलांनी ऑनलाईन क्लासेसबाबतच्या प्रश्न आणि शंकांव्यतिरिक्त या ग्रुप्समध्ये काही पाठवू नये. आता आम्ही शिक्षण विभागानं पाठवलेला हा आदेशही पालकांना पाठवला आहे.
शाळांच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर अश्लील मेसेजेस पाठवले गेल्यावर आणि सोबतच विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी बनवल्या गेलेल्या ग्रुप्सवर पॉर्न व्हीडिओज प्रसारित तक्रारी मागच्या काळात मिळाल्या. या तक्रारी मिळाल्यावर उत्तर दिल्ली महापालिकेनं अशा कुठल्याही कृत्यासाठी जबाबदार असलेल्या पालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: School, Whats app group