मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

वयाच्या 45व्या वर्षानंतर महिलांना जाणवते हिमोग्लोबीनची कमतरता; काय आहेत कारणं आणि उपाय?

वयाच्या 45व्या वर्षानंतर महिलांना जाणवते हिमोग्लोबीनची कमतरता; काय आहेत कारणं आणि उपाय?

ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या महिलांनाही अ‍ॅनिमिया होण्याचा धोका असतो. वयाच्या 45व्या वर्षानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे ही समस्या वाढत जाते. अ‍ॅनिमिया होण्यामागची कारणं जाणून घेऊ या.

मुंबई 09 सप्टेंबर : अ‍ॅनिमियाची (Anaemia) समस्या अनेक महिलांमध्ये दिसून येते. विशेषत: वयाच्या 45व्या वर्षानंतर बऱ्याच महिलांमध्ये हिमोग्लोबीनच्या कमतरतेची (Haemoglobin) समस्या दिसून येते. महिलांकडे घर, कुटुंब आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या असतात. त्या पूर्ण करता करता त्या स्वत:ची काळजी घेऊ शकत नाहीत. योग्य आहार न घेणं, मासिक पाळीमध्ये (Periods) जास्त रक्तस्राव, पाइल्सची समस्या आणि वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी डाएट (Diet) केल्याने महिलांना अ‍ॅनिमिया होण्याची सर्वाधिक शक्यता असते. ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या महिलांनाही अ‍ॅनिमिया होण्याचा धोका असतो. वयाच्या 45व्या वर्षानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे ही समस्या वाढत जाते. अ‍ॅनिमिया होण्यामागची कारणं जाणून घेऊ या. Keratin Rich Foods: या 4 पदार्थांमुळे केस गळतीवर बसेल लगाम, वजन कमी करण्यासाठीही होईल फायदा शरीरात हिमोग्लोबीन किती प्रमाणात आवश्यक आहे? 'हेल्थलाइन'च्या माहितीनुसार, लाल रक्तपेशी अर्थात रेड ब्लड सेल्समध्ये (Red Blood Cells) 30 ते 35 टक्के हिमोग्लोबीन असतं. हिमोग्लोबीन हे रक्तातलं मुख्य प्रोटीन असतं. पुरुषांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण किमान 15 ग्रॅम आणि महिलांमध्ये 13.6 ग्रॅम प्रति 100 मिलिलिटर असायला हवं. अ‍ॅनिमिया होण्यामागची कारणं रेड ब्‍लड सेल्‍समधल्या हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे अ‍ॅनिमिया होतो. हिमोग्लोबीन हे रेड ब्‍लड सेल्‍समधलं एक प्रोटीन असून, ते ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतं. लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अ‍ॅनिमिया हा सर्वात सामान्य आजार आहे. महिलांमध्ये अ‍ॅनिमिया होण्याचं सर्वांत मोठं कारण त्यांची मासिक पाळी आणि प्रेग्नन्सी हे असतं. शरीरातली लोहाची कमतरता, प्रेग्‍नन्सी आणि ब्‍लड लॉस-इंटर्नल ब्‍लीडिंग, आनुवंशिक कारणं, मेनोपॉज आणि हॉर्मोनल चेंजेस (Hormonal Changes) ही अ‍ॅनिमियाची कारणं आहेत. कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी लसणाचा होतो उपयोग; आहारातील या गोष्टीही ठरतात फायदेशीर अ‍ॅनिमियाची लक्षणं चक्कर येणं, त्वचा पिवळी पडणं, काहीही न करताही थकवा जाणवणं, पाय आणि हाताचे तळवे थंड पडणं, डोळ्याखाली काळी वर्तुळं येणं, शरीराचं तापमान कमी होणं, छातीत दुखणं आणि कायम डोकेदुखी जाणवणं ही अ‍ॅनिमियाची लक्षणं आहेत. हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी काय खावं? शरीरातली हिमोग्लोबीनची पातळी वाढवण्यासाठी बीट, हिरव्या पालेभाज्या, पालक, ब्रोकोली, कोबी, रताळी, खजूर, मनुका, बदाम हे ड्राय फ्रूट्स आणि डाळिंब, टरबूज, सफरचंद आणि द्राक्षं या फळांचा आहारात समावेश करावा. या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये शरीराची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. सकस आहार आणि व्यायाम या गोष्टी हिमोग्लोबीनची पातळी वाढण्यास मदत करू शकतात.
First published:

Tags: Health Tips

पुढील बातम्या