मराठी बातम्या /बातम्या /Viral /

तरुणीच्या चेहऱ्यावर पुरुषांप्रमाणे केस; कापण्याऐवजी वाढवली दाढी, आता मोठी समस्या राहिली उभी

तरुणीच्या चेहऱ्यावर पुरुषांप्रमाणे केस; कापण्याऐवजी वाढवली दाढी, आता मोठी समस्या राहिली उभी

आता तर तरुणीसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे.

आता तर तरुणीसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे.

आता तर तरुणीसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे.

    नवी दिल्ली, 6 मार्च : सद्याच्या काळात मुलांमध्ये लांब दाढी वाढवण्याची (How to grow beard) फॅशन असल्याचं दिसून येत आहे. अभिनेत्यांना पाहून तरुणदेखील दाढी वाढवू लागले आहेत. मात्र तुम्ही कधी कोणा मुलीला दाढी (Girl growing beard) वाढवलेलं पाहिलं आहे का? इंग्लंडमध्ये राहणारी एक तरुणी (England woman with beard) आपल्या दाढीसाठी खूप प्रसिद्ध आहे. लोकांमध्ये ती आकर्षणाचं केंद्र आहे. मात्र तिला ज्या परिस्थितीतून जावं लागत आहे, याचा कोणी अंदाजही लावू शकत नाही. इंग्लंडची राहणारी 31 वर्षीय हरनाम कौर (Harnaam Kaur) आता एक सोशल मीडिया सेन्सेशन झाली आहे. इंस्टाग्रामवर तिला 1 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. नुकच हरनाम मिरर वेबसाइटसोबत आपल्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलली. आणि दाढीमुळे कोणकोणत्या समस्येला तोंड द्यावं लागतं, याबद्दल सांगितलं. (Woman grow beard due to hormone imbalance) हरनाम जेव्हा 11 वर्षांची होती, तेव्हा तिच्या गळ्याभोवती केस येण्यास सुरुवात झाली. 12 व्या वर्षी हरनामची आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली. त्यावेळी तिला पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम (polycystic ovary syndrome) असल्याचं समोर आलं. हार्मोनल इम्बॅलेन्समुळे चेहऱ्यावर दाढी येते... पीसीओएसमुळे महिलांच्या हार्मोनच्या स्तरात बदल घडून येतो. यातील प्रमूख लक्षण म्हणजे अनियमित मासिक पाळी, चेहऱ्यावर केस येणे आणि प्रेग्नेन्सीमध्ये अडचणी येणे. जेव्हा हरनामच्या आईला याबाबत कळालं तर ती नियमित हरनामला सलूनमध्य़े घेऊन जात आणि चेहऱ्यावर वॅक्सिंग करीत होते. मात्र पुन्हा पुन्हा केस वाढत होेते. लहान वयात चेहऱ्यावर वॅक्सिंगचा त्रास सहन करताना एकेदिवशी हरनामने कधीच वॅक्सिंग करणार नसल्याचं ठरवलं आणि पुरुषांप्रमाणे दाढीचे केस वाढवू लागली. तेव्हापासून शाळेत तिचे मित्र चिडवू लागले. यामुळे तिला खूप मानसिक त्रास होत होता. सर्वाधिक त्रास तिला लाइफ पार्टनर शोधण्यासाठी लागत आहे. हरनामने सांगितलं की, त्यांना डेटिंगसाठी त्रास होत आहे. कारण कोणीच तिला अशा पद्धतीने स्वीकारू शकत नाही. जेव्ही ती 21 वर्षांची होती, तेव्हा भारतातील एक शीख मुलासोबत तिची बोलणी सुरू होती. त्यावेळी त्याने तिच्या दाढीवरुन प्रश्न उपस्थित केला नाही. मात्र तो तिला वेगळेच आक्षेपार्ह प्रश्न विचारू लागला. यामुळे संतापून 2 महिन्यांपूर्वी तिने हे नातं तोडलं. हरनामने सांगितलं की, तिला अनेक माथेफिरूही भेटले आहेत, जे केवळ एका दाढीवाल्या महिलेसोबत जवळीक साधण्यासाचा प्रयत्न करीत आहे. असं असतानाही हरनामने आपल्या दाढीचा स्वीकार केला आहे. तिला आता पार्टनरची अपेक्षा आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: London

    पुढील बातम्या