शिल्पा शेट्टीनं शेअर केला मजेदार VIDEO, पती राज गाऊ लागताच पहा काय झालं...

शिल्पा शेट्टीनं शेअर केला मजेदार VIDEO, पती राज गाऊ लागताच पहा काय झालं...

इन्स्टाग्रामवर सेलिब्रिटींच्या आयुष्यातील लहानसहान गोष्टीही लोकप्रिय होतात. शिल्पा शेट्टीच्या आयुष्यातील असाच एक मजेदार क्षण तिनं शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जानेवारी : शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ओळखली जाते, ती बॉलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून. नव्या वर्षाच्या सुरवातीला शिल्पा आणि तिचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांचा एक व्हिडीओ व्हायरल (video viral) झाला.

शिल्पा आपल्या कुटुंबासह नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करत होती. शिल्पा आणि राज दोघांनी आपल्या चाहत्यांना खास शैलीत नव्या यावर्षीच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर (social media) शिल्पा कायमच खूप सक्रिय असते. दोघांनी मिळून यावेळी आपली मुलगी समिशा (Samisha) हिचा क्युट व्हीडिओ शेअर केला. या व्हीडिओमध्ये राज कुंद्रा मुलीसोबत धमाल करताना दिसतात.

व्हिडीओत दिसतं, की शिल्पाचे पती राज गाणं गाण्याचा (singing) प्रयत्न करत आहेत. मात्र ते गाणं गायला सुरू करताच त्यांची चिमुरडी समिशा रडायला लागते. त्यांचे कुटुंबीयही हा व्हीडिओ आणि बाप-लेकीचं ट्युनिंग एन्जॉय करतात. शिल्पाच्या चाहत्यांनीही (fans) हा व्हीडिओ खूप उचलून धरला. या व्हीडिओत छोटी समिशा पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते आहे. केसात कपड्यांना मॅचिंग पिवळ्या रंगाची हेअर पिन दिसते आहे. या रूपात समिशा अतिशय क्युट दिसते आहे.

शिल्पानं हा व्हीडिओ शेअर करताना लिहिलंय, 'वरी लेस, सिंग मोअर, सेज समिशा शेट्टी कुंद्रा' यासोबतच त्यांनी गंमतीत पतीला म्हटलं आहे, की तू गाणं सोडून दिलं पाहिजेस. समिशा शेट्टी-कुंद्रा हिचा क्युट व्हीडिओ आधी राज कुंद्रा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. त्यानंतर स्वतः शिल्पानं तो व्हिडीओ आपल्या अकाउंटवर शेअर केला.

शिल्पा आपला योगा, फिटनेस टिप्स आणि जीवनशैलीविषयक सल्ले यासाठी सोशल मीडियावर कमालीची लोकप्रिय आहे. तरुण तिला फिटनेस आयकॉन मानतात.

Published by: News18 Desk
First published: January 10, 2021, 9:46 PM IST

ताज्या बातम्या