मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /जीवनात यशस्वी व्हायचंय? आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

जीवनात यशस्वी व्हायचंय? आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Acharya Chanakya Niti Marathi: आचार्य चाणक्यांच्या तत्वज्ञानाला आधुनिक काळातही खूप महत्त्व आहे. आपण दैनंदिन जीवनातही त्यांचं म्हणणं अंमलात आणू शकतो.

Acharya Chanakya Niti Marathi: आचार्य चाणक्यांच्या तत्वज्ञानाला आधुनिक काळातही खूप महत्त्व आहे. आपण दैनंदिन जीवनातही त्यांचं म्हणणं अंमलात आणू शकतो.

Acharya Chanakya Niti Marathi: आचार्य चाणक्यांच्या तत्वज्ञानाला आधुनिक काळातही खूप महत्त्व आहे. आपण दैनंदिन जीवनातही त्यांचं म्हणणं अंमलात आणू शकतो.

मुंबई, 25 फेब्रुवारी : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांची कुशाग्र बुद्धी आणि अचूक तर्क यामुळे लोक खूपच भारावून जात असत. याच कारणानं त्यांना कौटिल्य (Kautilya) म्हटलं जाऊ लागलं. चाणक्य हे एक कुशल राजनीतिज्ञ, चतुर कुटनीतिज्ञ आणि प्रकांडपंडित अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात.

आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्र (Acharya Chanakya Nitishastra) रचलं. आणि यामाध्यमातून आपलं ज्ञान आणि अनुभवावर आधारलेल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. सोबतच त्यांनी दुष्ट लोकांबाबत म्हटलं आहे, की जे लोक एखाद्याच्या व्यक्तिमत्वातील कमतरता इतरांच्या समोर उघड करतात ते अगदी छोट्याशा मुंगीमुळेही नष्ट होऊ शकतात. जसा एक साप मुंग्यांच्या वारूळात जाऊन मरून जातो.

याशिवाय इतरही अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या नीति (Chanakya Niti) आजही प्रासंगिक (relevant) आहेत. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या आहेत काही महत्त्वाच्या गोष्टी (Chanakya tips to succeed in life)

हेच आहे सर्वात उत्कृष्ट औषध

चाणक्य नीतिनुसार अमृत हे सर्वोत्कृष्ट औषध आहे. इंद्रिय सुखांमध्ये चांगलं भोजन हेच सर्वोत्कृष्ट सुख आहे. आणि मस्तक अर्थात डोकं हे शरीराच्या सर्व भागांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे.

हेही वाचा: अपघातात गमावले दोन्ही हात, तरी पोहण्यात पटकावलीत अनेक सुवर्णपदकं

असा व्यक्ती करू शकत नाही रक्षण

आचार्य चाणक्याच्या मते ज्याच्या रागावण्यामुळे मनात भय निर्माण होत नाही आणि जो प्रसन्न झाल्यावर समोरच्याला काहीच देत नाही तो ना कुणाचं रक्षण करण्यास योग्य आहे ना तो कुणावर नियंत्रण ठेऊ शकतो. असा माणूस मग काय करू शकेल?

मनात भय निर्माण करण्यास पुरेसे

चाणक्य नीति म्हणते, की नागानं आपली फणा काढली तर तो नाग विषारी नसला तरी त्याची ही कृती समोरच्याच्या मनात भय निर्माण करण्यास पुरेशी असते. इथं ही गोष्ट महत्त्वाची नसते की तो विषारी आहे किंवा नाही.

असे लोक नष्ट होतात

चाणक्य नीती सांगते, की असे दुष्ट लोक जे इतरांचे दोष दुसऱ्यांसमोर उघड करतात वा त्याची चर्चा करतात ते तसेच नष्ट होतात जसा एखादा साप मुंग्यांच्या वारूळात जाऊन नष्ट होतो.

हेही वाचा: जणू स्वर्गच उतरला धरतीवर; हिमाच्छादित नायगाराची अचंबित करणारी दृश्यं!

या लोकांना इंद्रासारखं वैभव मिळेल

आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, तुम्हाला इंद्रासारखं वैभव मिळेल जर तुम्ही देवाच्या गळ्यातील हार तुमच्या हातांनी बनवाल. जर तुम्ही देवासाठीचं चंदन आपल्या हातानं उगाळाल आणि आपल्या हातानं पवित्र ग्रंथ लिहाल.

(डिस्क्लेमर - या लेखातील माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारलेल्या आहेत. news 18 मराठी यांना पाठिंबा देत नाही. या सगळ्याची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ञाशी संपर्क करा.)

First published:
top videos

    Tags: Acharya chanakya, Chanakya niti, Lifestyle, Moral principles, Philosophy