जर घशात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवली असेल तर अस्वस्थ वाटतं. अॅलर्जी किंवा ताप असल्यास घसा खवखवतो शिवाय वेदनादेखील होतात. त्याचवेळी वातावरणात बदल झाल्यामुळे घशाची समस्या अधिक वाढते. कधीकधी तर खाणंपिणंही अशक्य होतं.
myupchar.com चे डॉ लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, घशात दुखणं किंवा वेदना होणं यावर उत्तम उपाय आयुर्वेदात आहे. घरगुती औषधोपचार करून आपण त्रासातून मुक्त होऊ शकता. जर आपल्या घशात खूप जास्त खवखव असेल तर डॉक्टरकडे जा. मात्र सौम्य खवखव किंवा वेदना असतील तर घरगुती उपचारांनी या समस्येवर मात करता येईल.
जेष्ठमध
पाण्यात जेष्ठमध टाकून त्या पाण्याने गुळण्या करा. जेष्ठमधातील अॅस्पिरिनचे गुणधर्म पुरेसे आहेत. मात्र गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी हे घरगुती उपचार करू नये.
दालचिनी
प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात दालचिनीचा उपयोग अन्नाची चव वाढवण्यासाठी केला जातो. या मसाल्यात बरेच औषधी गुणधर्म देखील आहेत. आयुर्वेदिक औषधातही दालचिनी बर्याच वर्षांपासून वापरली जात आहे. लवंगानंतर दालचिनी सर्वोत्तम अँटिऑक्सिडंट आहे. त्यात अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म देखील आहेत. बदामाच्या दुधात दालचिनी मिक्स करून प्यायल्याने घशाच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
मध
मध आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं आणि त्यात औषधी गुणधर्म खूप आहेत. औषधी गुणधर्मांमुळे मधाला आयुर्वेदातही महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. घशाची खवखव दूर करण्यासाठी ते इतर घटकांसहित वापरले जाते. वेदनेपासून मुक्तता ते संक्रमणाशी लढण्यास मदत असे मधाचे बरेच फायदे आहेत. दररोज एक चमचा मध कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने घशासाठी ते फायदेशीर ठरतं.
आलं
घसा खवखवणं, जळजळ होणं, वेदना होणं यासारख्या समस्या दूर करण्यासाठी दररोज आल्याचा चहा प्या. आलं एक नैसर्गिक वेदनशामक आणि वेदना निवारक आहे म्हणून घशात वेदना आणि जळजळ शांत करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तसंच खोकला कमी करण्यास देखील ते मदत करतं.
मीठ
घशातील जीवाणू नष्ट करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा. यामुळे घसा खवखवण्यापासून बराच आराम मिळेल. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिसळा. या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून दोन ते तीन वेळा ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा. घशाची खवखव दूर करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे.
अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - घसा दुखणे: लक्षणे, कारणे, उपचार...
न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.