मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आधार कार्डवर `या` दोन गोष्टी केवळ एकदाच कराव्यात अपडेट, अन्यथा...

आधार कार्डवर `या` दोन गोष्टी केवळ एकदाच कराव्यात अपडेट, अन्यथा...

आधार कार्डवरील (Aadhar Card) या दोन गोष्टी अपडेट करताना किंवा दुरुस्त करताना पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे.

आधार कार्डवरील (Aadhar Card) या दोन गोष्टी अपडेट करताना किंवा दुरुस्त करताना पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे.

आधार कार्डवरील (Aadhar Card) या दोन गोष्टी अपडेट करताना किंवा दुरुस्त करताना पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे.

नवी दिल्ली, 6 डिसेंबर: भाडेतत्वावर राहणारे किंवा नोकरीत बदली झाल्यामुळे लोक आधार कार्डवरील (Aadhar Card) पत्ता (Address) सातत्यानं बदलत असतात. परंतु, आधार कार्डवरील पत्ता किंवा फोटो (Photo) या दोन गोष्टी वारंवार अपडेट करता येत नाहीत. या गोष्टींमध्ये एकदाच बदल करणं योग्य असतं. युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया अर्थात `युआयडीएआय`ने (UIDAI) दिलेल्या माहितीनुसार, या दोन गोष्टी अपडेट करताना किंवा दुरुस्त करताना पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे, अन्यथा मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.

जन्म तारीख (Birth Date) हा आधार कार्डवरील न बदलता येणारा डेटा आहे. आधार कार्डवरील जन्म तारीख वारंवार बदलता येत नाही. त्यामुळे आधार कार्डवरील जन्म तारीख चुकीची असेल आणि त्यात तुम्ही बदल करत असाल तर अशावेळी योग्य जन्म तारीख देत आहे ना याची खात्री करा. कारण काही लोक आधार कार्डावर कोणतीही जन्म तारीख टाकतात आणि नर्सरीत प्रवेश घेतल्यानंतर ती शाळेनुसार बदलली जाते. त्यानंतर इयत्ता 10 वीच्या बोर्डासाठी ती पुन्हा बदलण्याचा प्रयत्न करतात. परंतु, त्यात बदल होत नाही. त्यामुळे जन्मतारीख बदलताना ती काळजीपूर्वक बदलणं आवश्यक आहे.

त्यानंतर नाव (Name) हा दुसरा असा डेटा आहे, की जो अपडेट करताना पुरेशी काळजी घ्यावी. कारण आधार कार्डावरील नाव वारंवार बदलता येत नाही. काही लोक आधार कार्ड काढताना शॉर्टमध्ये नाव लिहितात. असं नाव दुरुस्त करत पुन्हा कार्ड अपडेट करतात. अशावेळी नावाच्या स्पेलिंगकडंही (Spelling) लक्ष देत नाहीत. त्यामुळे गरजेवेळी नाव अपडेट (Update) करताना ते नीट आणि योग्य होत नाही. त्यामुळे अन्य सर्व कागदपत्रांवर जसं नाव आहे, त्याचप्रमाणे ते आधार कार्डवर अपडेट करा. `युआयडीएआय`च्या म्हणण्यानुसार नाव आणि जन्म तारखेत एकदा चूक होऊ शकते, वारंवार नाही. नाव, जन्म तारीख वारंवार बदलणं हे षडयंत्र समजलं जातं.

याबाबत गाझियाबाद (Ghaziabad) आधार सेवा केंद्राचे प्रभारी नीशू शुक्ला यांनी सांगितलं की, ''आधार कार्डावरील नाव आणि जन्म तारीख पुन्हा अपडेट करण्यासाठी अनेक औपचारीकता पुर्ण कराव्या लागतात. त्या पूर्ण करणं अवघड असतं. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकाचवेळी काळजीपूर्वक बदलल्या पाहिजेत. गाझियाबादमधील थापर प्लाझा, पंचवटी कॉलनी, भाटिया मोड येथे पहिलं आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आलं आहे. आधार कार्डासाठी येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सर्वप्रथम या गोष्टी सांगितल्या जातात'', असं शुक्ला यांनी सांगितलं.

या केंद्रावर गाझियाबाद व्यतिरिक्त देशातील कोणत्याही भागात राहत असलेला व्यक्ती आधार कार्ड काढू शकतो. दररोज 1000 नागरिकांचं आधार कार्ड काढण्याची तसेच यासंबंधी काम करण्याची या केंद्राची क्षमता आहे. सध्या येथे प्रतिदिन 500 नागरिकांची आधार कार्ड तयार केली जात आहेत. लोकांना आधार कार्ड काढण्यासाठी रांगेत उभी राहण्याची गरज नाही. नागरिक टोकन घेतल्यानंतर थेट केंद्रावर येऊ शकतात. डिस्प्लेवर क्रमांक येताच औपचारिकता पूर्ण करून आपलं आधार कार्ड तयार करून घेऊ शकतात. हे केंद्र सकाळी 9 ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू असते.

First published:

Tags: Aadhar card, Aadhar card on phone