मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /बापरे! ऐन दिवाळीच्या तोंडावर 150 वर्षांनंतर दुर्मीळ घुबडाचं दर्शन; शास्त्रज्ञही शॉक

बापरे! ऐन दिवाळीच्या तोंडावर 150 वर्षांनंतर दुर्मीळ घुबडाचं दर्शन; शास्त्रज्ञही शॉक

घुबडाला लक्ष्मीचं वाहन समजलं जातं. लक्ष्मीपूजनाआधी (LAXMIPUJAN) लक्ष्मीमातेच्या या वाहनाचं दर्शन झालंय. आता तज्ज्ञ या घुबडाचा शोध घेत आहेत.

घुबडाला लक्ष्मीचं वाहन समजलं जातं. लक्ष्मीपूजनाआधी (LAXMIPUJAN) लक्ष्मीमातेच्या या वाहनाचं दर्शन झालंय. आता तज्ज्ञ या घुबडाचा शोध घेत आहेत.

घुबडाला लक्ष्मीचं वाहन समजलं जातं. लक्ष्मीपूजनाआधी (LAXMIPUJAN) लक्ष्मीमातेच्या या वाहनाचं दर्शन झालंय. आता तज्ज्ञ या घुबडाचा शोध घेत आहेत.

  नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : डायनोसॉरसारखे असे अनेक प्राणी आहेत ज्यांच्याबद्दल आपण केवळ पुस्तकांमध्येच वाचतो. त्यांच्या फोटोंवरूनच त्यांना ओळखलं जातं. असे काही प्राणी कित्येक वर्षं माणसांच्या नजरेलाही पडत नाहीत. असे प्राणी नष्ट झाले असावेत असं मानलं जातं. आता आम्ही तुम्हाला ज्या घुबडाबद्दल (OWL) सांगणार आहोत, ती जातही नष्ट झाली आहे असंच म्हटलं जात होतं. या दुर्मीळ जातीच्या घुबडाचं गेल्या 150 वर्षांत मानवाला दर्शन झालं नव्हतं. (RARE OWL SPOTTED AFTER 150 YEARS) आता मात्र आपल्याकडच्या दिवाळीच्या बरोब्बर आधी हे घुबड घानाच्या (GHANA) अटेवाच्या जंगलात दिसल्याची माहिती आहे. त्यामुळे पक्षिप्रेमी प्रचंड खूश झाले आहेत. सोशल मीडियावरही या घुबडाचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.

  घुबडाची ही जात Shelley Eagle म्हणून ओळखली जाते. हे घुबड आफ्रिकेच्या पर्जन्यवनामध्ये (AFRICAN RAIN FOREST) आढळलं. याचा आकार बघून आश्चर्यचकित व्हायला होतं. (BIG OWL) इतर घुबडांच्या मानाने हे घुबड चांगलंच मोठं आहे. हे नुकतंच म्हणजे 16 ऑक्टोबरला जंगलात दिसलं होतं. संशोधकांची नजर या घुबडावर पडल्यापडल्या लगेचच त्यांनी या घुबडाचे भरपूर फोटो काढले. हे घुबड फक्त 15 सेकंदच दिसलं होतं. फोटो काढल्यानंतर हे घुबड लगेचच उडून गेलं. अर्थातच यामुळे हे स्पष्ट झालं की घुबडाची ही जात नष्ट झालेली नाही. त्यामुळे संशोधकांनी आता जंगलात पुन्हा या घुबडांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. ghanaspora (@ghanaspora) या ट्विटर अकाउंटवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

  हे ही वाचा-कोंबड्यांमुळे कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसचं संकट; नव्या महासाथीसाठी तयार राहा

  या जातीची घुबडं आकाराने बरीच मोठी असतात. त्यांचे डोळे गडद काळ्या रंगाचे असतात. 150 वर्षांपूर्वी ही घुबडं दिसत असत असं म्हटलं जातं; मात्र त्यानंतर ही घुबडं दिसेनाशी झाली. आकारामुळे ही घुबडं घारीसारखी दिसतात. वर्षानुवर्षं या घुबडांचं दर्शन न झाल्यामुळे ही प्रजात नष्ट झाली आहे असंच वाटत होतं. आता दिवाळीच्या अगदी बरोब्बर आधी या घुबडाचं 15 सेकंदांसाठी का होईना पण दर्शन झालंय. घुबडाला लक्ष्मीचं वाहन समजलं जातं. लक्ष्मीपूजनाआधी (LAXMIPUJAN) लक्ष्मीमातेच्या या वाहनाचं दर्शन झालंय. आता तज्ज्ञ या घुबडाचा शोध घेत आहेत. त्याचबरोबर शिकाऱ्यांच्या हाती लागण्याआधी ते वनविभागाच्या हाती लागावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे या दुर्मीळ जातीच्या घुबडाच्या संरक्षणसाठी काम सुरू होईल.

  याआधी या घुबडाचा शेवटचा फोटो 1870 मध्ये घेतला गेला होता. त्यानंतर या घुबडाचं कोणालाही दर्शन झालं नव्हतं. आता अचानक या घुबडाचं 15 सेकंद दर्शन झालं. घुबड आकाराने इतकं मोठं असू शकतं यावर या घुबडाला पहिल्यांदा पाहणाऱ्या शास्त्रज्ञांचा विश्वास बसतच नव्हता. ही जात पृथ्वीतलावरून नष्ट झालेली नाही हे यावरून स्पष्ट झालं, हे सर्वांत महत्त्वाचं असल्याचं शास्त्रज्ञ मानत आहेत.

  First published: