• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Viral Video: चिमुकल्याची कमाल! लगोरी, विटीदांडू ही विसराल, पाहा लहानग्यांचा नवा खेळ

Viral Video: चिमुकल्याची कमाल! लगोरी, विटीदांडू ही विसराल, पाहा लहानग्यांचा नवा खेळ

टायर पिरवण्यात काय मजा असते ते आताच्या काळात काय कळणार.

टायर पिरवण्यात काय मजा असते ते आताच्या काळात काय कळणार.

एका लहान मुलाचा व्हिडिओ सध्या व्हायर (Viral Video) झाला आहे. सगळेजण त्याच्या प्रेमात पडलेत.

 • Share this:
  दिल्ली, 27 जून: ‘लहान पण देगा देवा’ ही भावना प्रत्येकांच्या मनात असते. लहानपणी खेळलेले खेळ (Games), मस्ती, मजा आपल्याला संपूर्ण आयुष्यभर आठवत (Lifelong memories) राहते. जंगलात फिरणं, गोट्या खेळणं, लगोरी, लपाछपी, आट्यापाट्या, विटीदांडू हे खेळ आताच्या काळात लोप पावत चालले आहेत. हल्ली मुलांच्या हातात केवळ मोबाईल फोन (Mobile) दिसतो. बरेच पालक मुलांना बोलतात की, अरे आम्ही आमच्या काळात जी मजा केलीय ती तुम्हाला माहितीही नाही. खरोखरचं पावसाची सर आल्यावर पाण्यात होड्या सोडण्यात जो आनंत होता तो आजच्या मुलांना कळणार नाही. ( मोदी सरकारनेही दिला ग्रीन सिग्नल; प्रेग्नन्सीत कोरोना लस घेणं का आहे महत्त्वाचं?) टायर पिरवण्यात काय मजा असते ते आताच्या काळात काय कळणार. त्याच आठवणी ताजा करणारा एक व्हीडिओ सध्या व्हायर (Viral Video) झालाय. एखाद्या गावातला किंवा वाडीतला हा व्हीडिओ आहे. हा मुलगा शरीराची मुटकूळी करून एका टायरमध्ये स्वत:ला अशा प्रकारे बसवतोय की, त्याच्या लवचिक शरीराला दाद द्यावी लागेल. त्याही पुढे जाऊन टायरच्या आता बसून तो स्वत:लाच गोल फिरवतो आहे. एका रोडवर गोलगोल फिरत पुढे जाऊन पुन्हा मागेही येतो. त्याचा हा पराक्रम पाहून सर्कसची आठवण होते. आयपीएस ऑफिसर रुपिन शर्मा (IPS Officer Rupin Sharma)  यांनी आपल्या ट्विटर (Twitter)अकाऊंट करून हा व्हीडिओ शेर केलाय. अगदी थोड्याच वेळात त्याला हजारो लाईक मिळालेत.
  Published by:News18 Desk
  First published: