मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Video: 60 व्या वर्षी एक मजूर बनला मॉडेल; जबरदस्त चेंजमुळं सोशल मीडियावर हवा

Video: 60 व्या वर्षी एक मजूर बनला मॉडेल; जबरदस्त चेंजमुळं सोशल मीडियावर हवा

त्याचा हा 'ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ' फोटोग्राफरनं इन्स्टाग्रामवर शेअर (Share on Instagram) केला होता. त्यामुळं आता ममीक्का त्याच्या गावात स्टार बनलाय आणि गावात आता त्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.

त्याचा हा 'ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ' फोटोग्राफरनं इन्स्टाग्रामवर शेअर (Share on Instagram) केला होता. त्यामुळं आता ममीक्का त्याच्या गावात स्टार बनलाय आणि गावात आता त्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.

त्याचा हा 'ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ' फोटोग्राफरनं इन्स्टाग्रामवर शेअर (Share on Instagram) केला होता. त्यामुळं आता ममीक्का त्याच्या गावात स्टार बनलाय आणि गावात आता त्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : केरळमधील एक 60 वर्षीय रोजंदारी मजूर त्यानं त्याच्या लुक्समध्ये करून घेतलेल्या आमुलाग्र बदलांमुळं आणि व्यावसायिक मॉडेलप्रमाणं केलेल्या फोटोशूटमुळं रातोरात हिट (Kerala labourer to model) झालाय. मम्मीक्का असं या हौशी मजुराचं नाव असून त्याच्या व्हिडिओनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिलीय.

अफलातून मेकओव्हरमुळं मूळ कोडिवल्ली, वेन्नाकडू येथील रहिवासी असलेला मम्मीक्का (Mammikka) हा मजूर आता मॉ़डेल बनला आहे. त्याचा हा 'ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ' फोटोग्राफरनं इन्स्टाग्रामवर शेअर (Share on Instagram) केला होता. त्यामुळं आता ममीक्का त्याच्या गावात स्टार बनलाय आणि गावात आता त्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.

व्हिडीओची सुरुवात जुनी लुंगी आणि जुनाट शर्ट घालून निघालेल्या एका वृद्ध व्यक्तीपासून होते. त्यानंतर त्याचं रूपांतर होत असलेलं पाहायला मिळतं. दाढी ट्रिम करणं, केस कापणं आणि इतर अनेक सलून ट्रीटमेंट नंतर, मम्मीक्का त्याच्या फोटोशूटसाठी खरेदी करण्यासाठी सज्ज होतो. व्हिडिओचा शेवट संपूर्णपणे नवीन लूकमध्ये असलेल्या आणि व्यावसायिक मॉडेलप्रमाणं सफाईदारपणे पोझ देणाऱ्या मनुष्यानं होतो. मम्मीक्का या प्रसिद्धीमुळं खूप खूश आहे.

हे वाचा - Arjun Kapoor ने मलायका अरोराला केलं ट्रोल, अभिनेत्रीची अशी होती प्रतिक्रिया

छायाचित्रकार शारिक वायलीलनं मम्मीक्काला पाहिलं आणि अभिनेता विनायकन यांच्याशी साम्य असल्यानं त्यानं फेसबुकवर त्याचा फोटो पोस्ट केला. वेडिंग सूट फोटोशूट करण्याचं ठरवलेल्या वायलीलला आधीच मम्मीक्काच्या रूपानं त्याचा मॉडेल सापडला.

सूट, टाय आणि सनग्लासेस घातलेल्या मम्मीक्कानं शूटसाठी हातात आयपॅड घेऊन पोज दिली. दुसर्‍या फोटोमध्ये, मम्मीक्कानं जोधपुरी सूट, पगडी, एथनिक ज्वेलरी आणि सनग्लासेस परिधान केले होते. त्‍याच्‍या हातात एक छोटी तलवार देखील होती.

हे वाचा - Instagram च्या विविध पोस्ट एकत्र करता येतील डिलीट, तुम्हाला माहितेय का हे फीचर?

सोशल मीडियावर नवीन-प्रसिद्धीनंतर, मम्मीक्का म्हणाला, आता त्याला रोजंदारीवर काम करण्याच्या त्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त मॉडेलिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 60 वर्षीय मम्मीक्कानं आता इंस्टाग्रामवर देखील एन्ट्री केलीय. आता तो इन्स्टाग्रामवर या शूटमधील छायाचित्रं पोस्ट करत आहे.

First published:

Tags: Kerala, Model