• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • 'या' राज्यात 81% नमुने UK corona variant positive; तरुणांमध्ये धोका वाढला

'या' राज्यात 81% नमुने UK corona variant positive; तरुणांमध्ये धोका वाढला

देशात आतापर्यंत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे (Coronavirus new varient) एकूण 795 रुग्ण आढळून आले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 मार्च : भारतात एकिकडे कोरोना लसीकरणाचा (Corona vaccination) वेग वाढवला जातो आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्णांची (Coronavirus in India) संख्या झपाट्याने वाढते आहेत. त्यातही आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे (Coronavirus new strain) रुग्णही वाढताना दिसत आहेत. आतापर्यंत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे (Coronavirus new variant) एकूण 795 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये यूके, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा समावेश आहे. दरम्यान यूकेतील नवा कोरोना (UK corona variant) हा तरुणांना जास्त संक्रमित करत असल्याचं दिसून आलं आहे. पंजाबमध्ये 401 नमुन्यांपैकी  81% नमुने यूके व्हेरिएंट पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. हा नवा स्ट्रेन तरुणांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळून आला आहे, असं पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितलं. त्यामुळे तरुणांचंही लसीकरण करावं, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. यूकेच्या  B.1.1.7 या कोरोना व्हेरिएंटवर कोविशिल्ड कोरोना लस प्रभावी असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण होणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. तसंत कोरोना नियमांचं पालन करावं, असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं आहे. हे वाचा - मोदी सरकारचा मोठा निर्णय; 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना मिळणार कोरोना लस दरम्यान भारतात आता 45 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचंही लसीकरण केलं जाणार आहे. आतापर्यंत 45 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लस दिली जात होती पण या व्यक्ती अशा होता ज्यांना इतर आजार होतं. पण आता ज्यांना इतर आजार नाहीतर त्यांनादेखील ही लस दिली जाणार आहे. एक एप्रिलपासून हे लसीकरण सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हे वाचा - भारताने लसीकरणाचं धोरण बदलण्याची गरज? वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान तज्ज्ञांचा सल्ला भारतात जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू करण्यात आलं.  लसीकरणाचा आज 66 वा दिवस आहे.  केंद्र सरकारने मंगळवारी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात  4.8 कोटी (4,84,94,594) लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. त्यापैकी 78,59,579 आरोग्य कर्मचारी आणि 82,42,127 फ्रंटलाइन वर्कर्सना पहिला तर 49,59,964 आरोग्य कर्मचारी आणि 29,03,477 फ्रंटलाइन वर्कर्सना लशीचा दुसरा डोस मिळाला आहे. 45 ते 60 वयोगटातील इतर आजार असलेल्या 42,98,310 नागरिकांनी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दोन कोटींपेक्षा जास्त वयस्कर व्यक्तींनी लशीचा पहिला डोस घेतला आहे.
  Published by:Priya Lad
  First published: