जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अभी तो मै जवान हूं! 'या' 53 वर्षांच्या बॉडीबिल्डर आजींवर तरुण होतात फिदा; बॉडी एकदा बघाच

अभी तो मै जवान हूं! 'या' 53 वर्षांच्या बॉडीबिल्डर आजींवर तरुण होतात फिदा; बॉडी एकदा बघाच

अ‍ॅंड्रिया सनशाइन

अ‍ॅंड्रिया सनशाइन

तीन तास जिममध्ये (Gym) कसून व्यायाम करणारी ही महिला वयाच्या 53 व्या वर्षीदेखील तरुण दिसते. त्यामुळे तिच्या निम्म्या वयाचे तरुण तिला डेटसाठी विचारत असतात

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    लंडन, 17 मार्च: गेल्या काही वर्षांत सिक्स पॅक (Six Pack) हा तरुणाईमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. सिक्स पॅक बॉडीसाठी अनेक तरुण जिममध्ये अनेक तास व्यायाम करताना आपण पाहतो. अनेक सेलेब्रिटीज सिक्स पॅक बॉडी आणि पीळदार शरीरयष्टीमुळे तरुणांचं आकर्षण ठरत आहेत. या सर्वांत सध्या 53 वर्षांची महिला विशेष चर्चेत आहे. दोन नातवांची आजी (Grand Mother having body) असणारी ही महिला पीळदार शरीरयष्टीसाठी ओळखली जाते. दररोज किमान तीन तास जिममध्ये (Gym) कसून व्यायाम करणारी ही महिला वयाच्या 53 व्या वर्षीदेखील तरुण दिसते. त्यामुळे तिच्या निम्म्या वयाचे तरुण तिला डेटसाठी विचारत असतात. खरं तर तिचा फिटनेस आणि असं दिसण्यामागे अनेक गोष्टी आहेत. याबाबतचं वृत्त `आज तक`ने प्रसिद्ध केलं आहे. लंडन (London) येथील अ‍ॅंड्रिया सनशाइन (Andrea Sunshine) या बॉडीबिल्डर (Bodybuilder grandmother) आहेत. त्यांचा फिटनेस (Fitness) सध्या चर्चेत आहे. रोज किमान तीन तास जिममध्ये व्यायाम करणाऱ्या अ‍ॅंड्रिया डाएटबाबत (Diet) खूपच काटेकोर आहेत. त्या दर महिन्याला 150 अंडी आणि 10 किलो रताळी खातात. त्यांना सॅलड आणि भाज्या विशेष आवडतात. यात त्या ब्रोकोली प्राधान्याने खातात. `डेली मेल`शी बोलताना अ‍ॅंड्रिया यांनी सांगितलं, `अंड्यांची ही संख्या ऐकून अनेकांना आश्चर्य वाटतं; पण हे खरं आहे. मी दिवसभरातला बराचसा वेळ ट्रेनिंगसाठी देते. माझं डाएट न्यूट्रिशनिस्ट ठरवतो. मी प्रत्येक वेळी काही तरी चांगलं करण्याचा प्रयत्न करते; मात्र त्यासाठी आपल्याला काही तरी गमवावं लागतं.` जिलेबी आणि सामोशाचा विचित्र कॉम्बो; VIRAL VIDEO पाहून चिडले नेटकरी अ‍ॅंड्रिया रोज वर्क-आउट करतात. प्रमाणापेक्षा अधिक अंडी खाल्ल्याचा परिणाम अ‍ॅंड्रिया यांच्यावर दिसून येतो. त्यामुळे त्यांना जास्त कॅलरीजची (Calories) गरज भासते. त्या 6 ते 8 वेळा खातात. यात किमान 3500 कॅलरीज असतात. विहित मानकांनुसार, प्रौढ महिलांनी रोजच्या आहारात 2000 कॅलरीज घेतल्या पाहिजेत; मात्र हा आकडा वय, वर्क आउटचा कालावधी किंवा काही आजार नाही ना आदी गोष्टींवर ठरवला जातो. आपल्या फिटनेसबाबत अ‍ॅंड्रिया सांगतात, `मला अनेक जण `फिटनेस आजी` म्हणून हाक मारतात. माझा यास कोणताही आक्षेप नाही. कारण माझं शरीर कमनीय आणि हेल्दी आहे. काही जण मला बीस्ट अर्थात पशू म्हणतात. तरुण पुरुषांना सुंदर आणि प्रौढ दिसणाऱ्या महिलांवर क्रश असतो. त्यामुळे मी त्यांना आवडते. यातले बहुतांश पुरुष 30 ते 35 वयोगटातले आहे. काहींचं वय तर 25 वर्षांपेक्षाही कमी आहे. मला वर्क-आउट करायला खूप आवडतं. स्वतःची काळजी घेणं हे प्रेमाचं काम आहे, हे मी काळानुरुप शिकले. मी काय खावं, हे स्वतः ठरवते. माझ्या मनात येईल तेव्हा मी फॅट आणि गोड पदार्थ खाणं बंद करते. वाढत्या वयानुसार महिलांनी केवळ घर आणि कुटुंबालाच वेळ दिला पाहिजे, असा समज आपल्याकडे आहे; पण मी दोन्ही गोष्टी करू शकते,` असं अ‍ॅंड्रिया यांनी स्पष्ट केलं. उन्हाळ्यात ताक पित नसाल तर चुकतोय तुमचा डाएट; इतके फायदे हातचे घालवाल अ‍ॅंड्रिया यांचे ऑनलाइन फॅन फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेले फॅन्सही त्यांना डेटसाठी विचारतात. विशेष म्हणजे इन्स्टाग्रामवर (Instagram) अ‍ॅंड्रिया यांचे 60 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या फिटनेसविषयीच्या पोस्ट नेहमीच चर्चेत असतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात