मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Buttermilk: उन्हाळ्यात ताक पित नसाल तर चुकतोय तुमचा डाएट; इतके फायदे हातचे घालवाल

Buttermilk: उन्हाळ्यात ताक पित नसाल तर चुकतोय तुमचा डाएट; इतके फायदे हातचे घालवाल

लस्सीमधील पोषक घटक - 
लस्सीमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिड मोठ्या प्रमाणात आढळतात. याशिवाय लस्सीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि झिंक देखील असते. हे सर्व पोषक तत्व आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

लस्सीमधील पोषक घटक - लस्सीमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिड मोठ्या प्रमाणात आढळतात. याशिवाय लस्सीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि झिंक देखील असते. हे सर्व पोषक तत्व आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

ताज्या दह्यापासून बनवलेले ताक विशेषत: उन्हाळ्याच्या (Summer) दिवसात अधिक फायदेशीर मानलं जातं. त्यामुळे पोट जड होणं, अस्वस्थता, भूक न लागणं, अपचन, पोटाची जळजळ इत्यादी त्रास कमी होतात.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 17 मार्च : ताक (buttermilk) नियमित प्यायल्यानं शरीराला अनेक आजारांपासून संरक्षण मिळतं. दह्यापासून ताक बनवले जाते. दही मंथनातून तूप काढल्यावर जो द्रव राहतो त्याला आपण ताक म्हणतो. ताज्या दह्यापासून बनवलेले ताक विशेषत: उन्हाळ्याच्या (Summer) दिवसात अधिक फायदेशीर मानलं जातं. त्यामुळे पोट जड होणं, अस्वस्थता, भूक न लागणं, अपचन, पोटाची जळजळ इत्यादी त्रास कमी होतात. अन्न पचत नसेल तर भाजलेले जिरे, काळी मिरी पावडर आणि खडे मीठ ताकात मिसळून घेतल्याने जेवण लगेच (Benefits of drinking buttermilk) पचते.

ताकमधील घटक

ताकामध्ये आढळणाऱ्या घटकांबद्दल सांगायचे झाल्यास ताकामध्ये अ, ब, क, ई आणि के जीवनसत्त्वे असतात. उन्हाळ्यात याचे सेवन केल्यानं आपल्या शरीराला पुरेसे पोषक तत्व मिळतात.

ताकाचे जादुई फायदे

1. पाण्याची कमतरता भासत नाही

ताक प्यायल्यानं शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. उन्हाळ्यात भरपूर घाम येतो त्यामुळे डिहायड्रेशनची होऊ शकतं. म्हणूनच डॉक्टरसुद्धा उन्हाळ्यात विशेषतः ताक पिण्याचा सल्ला देतात. त्यातून पाण्याची कमतरता भरून निघते. उन्हाळ्यातही आल्हाददायी वाटतं.

2. हाडे मजबूत होतात

ताकामध्ये पुरेसे कॅल्शियम असते, त्यामुळे हाडे मजबूत होतात. याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही ऑस्टिओपोरोसिस नावाच्या आजारापासून वाचू शकता.

3. पचनक्रिया व्यवस्थित राहते

ताक प्यायल्यानं पचनक्रिया चांगली राहते. ताक हे प्रोबायोटिक्सचं काम करतं, त्यामुळे शरीरात आतड्यांच्या कार्याला गती मिळते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.

हे वाचा - वयाच्या चाळिशीनंतरही चेहरा दिसेल अगदी तरुण; फक्त आवळ्या असा करा उपयोग

4. अॅसिडिटीचा त्रास होत नाही

ताक प्यायल्यानं अॅसिडिटीपासून जलद आराम मिळतो. जेवणानंतर काही वेळानी ताक पिऊ शकता. यामुळे अॅसिडिटीमुळे छातीत जळजळ होण्यापासून आराम मिळेल.

5. वजन कमी करण्यासाठी

ताक नियमित सेवन केल्याने तुम्ही वाढते वजन कमी करू शकता. ताकामध्ये कॅलरीज आणि फॅट कमी असतं. ताक एक प्रकारे फॅट बर्नर म्हणूनही काम करतं.

हे वाचा - चालण्याचा व्यायाम करताना अनेकांकडून ही चूक होते; फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक

ताक पिण्याची योग्य वेळ

उन्हाळ्याच्या दिवसात विविध प्रकारचे मसालेदार पदार्थ खाल्ल्यानं शरीरात सूज येऊ शकते. अशावेळी ताक प्यायल्यास ताक मसालेदार अन्नाचा प्रभावाला न्यूट्रल करतं. अन्न खाल्ल्यानंतर पोट जड वाटत असेल तर ताक घ्या. त्यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतात. पोट हलकं वाटतं.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health Tips, Summer