Home /News /lifestyle /

Corona vaccination साठी 4 अंकी सिक्युरिटी कोड नेमका कशासाठी?

Corona vaccination साठी 4 अंकी सिक्युरिटी कोड नेमका कशासाठी?

कोरोना लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतर आणि स्लॉट बुक केल्यानंतर तुम्हाला 4 अंकी सिक्युरिटी कोड मिळेल.

मुंबई, 08 मे : देशात 1 मेपासून तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला (vaccination) सुरुवात झाली आहे. लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर ( CoWIN portal) नोंदणी करणं आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला देण्यात येणाऱ्या वेळेत तुम्ही लस घेऊ शकता, असा नियम आहे. मात्र अशातच बऱ्याच लोकांना लशीची तारीख मिळते आहे. परंतु ते त्या तारखेला जाऊ शकत नाहीत तरीही त्यांना लस घेतल्याचा मेसेज येत आहे. व्हॅक्सिनेटर चुकीच्या पद्धतीने लोकांना लसीकरण झाल्याची माहिती देत आहेत. अशाप्रकाचे गैर प्रकार किंवा चुकीची माहिती नागरिकांना देऊन त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कोविन सिस्टिम 8 मेपासून लसीकरण नोंदणीमध्ये नवीन फीचर आणत असल्याचं  आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. 8 मे 2021 पासून कोविन ॲपवर नोंदणी करताना व्हॅक्सिनेशन स्लॉट पक्का केल्यानंतर युझरला एसएमएसने 4 अंकी सिक्युरिटी कोड देण्यात येईल. त्यानुसार युझर लसीकरणासाठी गेल्यावर तिथे त्याला हा सिक्युरिटी कोड सांगावा लागेल. जेणेकरून त्याने बुक केलेल्या स्लॉटमध्ये त्यालाच लस मिळेल. को-विन अपवर व्हॅक्सिन स्लॉट (वेळ) कसा बूक करायचा? सर्वप्रथम कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपमधील व्हॅक्सिनेशन सेक्शनमध्ये जा. इथे तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करा आणि ओटीपी मिळवा. जर हे तुम्ही आधीच केले असेल तर साइन इन करा. साइन-इन केल्यानंतर तुमचे राज्य आणि जिल्हा निवडा. जर तुम्हाला तुमच्या घराजवळचे लसीकरण केंद्र आणि त्याचा योग्य पिनकोड नंबर माहित असेल तर तुम्ही पिनकोडच्या मदतीने बाकीची प्रक्रिया टाळू शकता. त्यानंतर तिथे तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या लसीकरण केंद्रांचे नाव आणि उपलब्ध असलेला टाईम स्लॉट दिसेल. हे वाचा - मुंबईतून E-Pass साठीचे 73% अर्ज नाकारले, पोलिसांनी सांगितली दोन महत्त्वाची कारणं तुम्ही तुमच्या सोईनुसार लसीकरण केंद्र आणि वेळ निवडा आणि बुकिंग कन्फर्म करा. बुकिंग कन्फर्म झाल्यानंतर तुमच्या फोनवर 4 अंकी सिक्युरिटी कोड एसएमएसद्वारे येईल. दुसऱ्या दिवशी लसीकरण केंद्रावर जाऊन तुमच्या बुकिंगसाठी हा सिक्युरिटी कोड दाखवा. लस घेतल्यानंतर तुमचा फोन नंबर टाकून को-विन अपवर लॉग इन करा आणि तुमचे लसीकरणाचे सर्टिफिकेट डाऊनलोड करा. या नवीन सिस्टमचा नागरिकांना कसा फायदा होणार? मिळालेल्या माहितीनुसार, लसीकरण केंद्रांवरील अधिकाऱ्यांना हा 4 अंकी कोड सांगितल्यानंतरच तुमचं लसीकरण सर्टिफिकेट तयार केलं जाईल. या नवीन अपडेटचा मुख्य हेतू हा लसीकरण प्रमाणपत्र तयार करण्यातील त्रुटी कमी करणं आहे. बऱ्याच जणांना केवळ नोंदणी केल्यानंतर आणि टाईम स्लॉट बूक केल्यानंतर लसीकरण झाल्याचं मेसेज येत आहेत. त्यामुळे या नवीन कोडमुळे लसीकरण केंद्रात जाऊन लस घेतल्याचं नमूद केल्यानंतरच लसीकरण झाल्याचं गृहीत धरण्यात येईल. हे वाचा - covid-19 : घर बसल्या तपासा फुप्फुसांची ताकद; जाणून घ्या सोपी पद्धत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लसीकरण मोहिमेत अडथळा आणणाऱ्या तसंच चुकीची माहिती देणाऱ्यांवर या नवीन पद्धतीमुळे आळा बसेल. याची खात्री करण्यासाठी को-विन अप (CoWIN Portal) व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवर (vaccination certificate) ऑटोमॅटिक जनरेट होणारा सिक्युरिटी कोड (security code)  छापणार आहे. हे नवीन सिक्युरिटी फिचर उद्यापासून कोविनवर लसीकरणासाठी बुकिंग करणाऱ्यांसाठी लागू होईल.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Technology

पुढील बातम्या