मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /फक्त ही 3 योगासनं करून हेल्दी आणि फीट व्हा; Omicron सारख्या आजारांना दूर ठेवा

फक्त ही 3 योगासनं करून हेल्दी आणि फीट व्हा; Omicron सारख्या आजारांना दूर ठेवा

ओमिक्रॉनसारख्या आजारांशी दोन हात करण्यासाठी ही योगासनं मदत करतील.

ओमिक्रॉनसारख्या आजारांशी दोन हात करण्यासाठी ही योगासनं मदत करतील.

ओमिक्रॉनसारख्या आजारांशी दोन हात करण्यासाठी ही योगासनं मदत करतील.

    मुंबई, 15 डिसेंबर : कोरोना विषाणुमुळे झालेल्या महासाथीचा प्रभाव आता ओसरू लागला आहे. पण त्याचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. याच काळात ओमिक्रॉन (Omicron) हा विषाणू आला असल्याने आणखी दहशत वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळे नागरिक रोगप्रतिकारक शक्ती (How to increase immunity) वाढवून कोरोनापासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आहार जितका महत्त्वाचा आहे, तितकाच व्यायामही (Excercise for immunity) .

    अशी  काही योगासनं आहे जी तुमची रोगप्रतिकार शक्ती  (Yogasana for immunity)  चांगली राखू शकतात. ही योगासनं  केल्यास फायदा होऊ शकतो. आता ही योगासनं कोणती ते पाहुयात.

    भुजंगासन

    एखादा नाग फणा काढल्यावर जसा दिसतो तशी मुद्रा या योगासनात केली जाते त्यामुळे या आसनाला भुजंगासन असं नाव दिलं आहे. यासाठी तुम्ही पोटावर झोपा. दोन्ही हातांचे तळवे खांद्यांच्या रेषेत शेजारी आणा. पायांतील अंतर कमी करून ते जोडा आणि ताठ ठेवा. आता श्वास घेत हातांवर जोर देऊन डोक्यापासून कंबरेपर्यंचा भाग हळूहळू उचला. ही स्थिती एखाद्या फणा काढलेल्या नागासारखी दिसते. यात कंबरेवर खूप ताण पडणार नाही याची काळजी घ्या. या स्थितीत काही सेकंद थांबा. हळूहळू श्वास सोडत पुन्हा आधीच्या स्थितीत म्हणजे जमिनीवर झोपलेल्या स्थितीत या.

    हे वाचा - Alert! तुम्हालाही रात्री होतोय का असा त्रास? हे ओमिक्रॉनचं लक्षण, दुर्लक्ष नको

    हे आसन 5 ते 7 वेळा करावं म्हणजे फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि श्वसन प्रणाली चांगली राहते. याने पचनक्रियाही सुधारते.

    पश्चिमोत्तासन

    जमिनीवर पाय पसरून बसा. श्वास घेत दोन्ही हात वरच्या दिशने न्या. आता हळूहळू श्वास सोडत सोडत जेवढं शक्य तेवढं कंबरेच्या वरचं शरीर पुढे झुकवा. आदर्श स्थितीमध्ये तुमचं नाक गुडघ्यांना टेकलं पाहिजे आणि दोन्ही हात पायांच्या तळव्यांना टेकायला हवेत. काही क्षण या स्थितीत रहा. हळूहळू मूळ स्थितीमध्ये परत या. जर तुम्हाला पाठीचं काहीही दुखणं असेल तर तुम्ही हे आसन करू नका. शारीरिक तसंच मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी पश्चिमोत्तानासन उपयुक्त आहे. पश्चिमोत्तानासन केल्यामुळे शरीर लवचिक होतं आणि रक्ताभिसरण सुरळीत होतं.

    सेतूबंधासन

    जमिनीला पाठ टेकून झोपा. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून नितंबांपर्यंत आणा. हळूहळू श्वास घेताघेता नितंब वर उचला आणि हातांनी घोटे घट्ट पकडा. पाय जमिनीवर रोवा. डोकं आणि खांदे जमिनीवर टेकून ठेवा. तुम्हाला शक्य तसा श्वासोच्छवास करा. हळूहळू पूर्वस्थितीत या. सेतूबंधासनामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसंच छाती, मान आणि पाठीच्या कण्यावर ताण पडतो. या आसनामुळे पोटातील अवयव, फुफ्फुसं आणि थायरॉइड ग्रंथी उत्तेजित होतात. यामुळे पचनक्रिया सुधारते तसंच डोकं शांत होतं.

    हे वाचा - असा खोकला म्हणजे साधासुधा नव्हे बरं का; महाभयंकर आजाराचं लक्षण, वेळीच सावध व्हा

    योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. त्यामुळे त्याचा फायदा आपण भारतीयांनी तर करायलाच हवा. कोरोनाशी लढायलाही योगाचा उपयोग होतो.

    First published:

    Tags: Fitness, Health, Lifestyle, Yoga day