महिलांमध्ये नेहमीच वजन वाढण्याची समस्या दिसून येते, विशेषतः बाळाला जन्म दिल्यावर ही समस्या आढळून येते. वजन वाढल्यावर पोटही मोठे होते. महिलांमध्ये पोट वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे स्नायूंवर आलेला ताण आहे. या काळात स्नायू पसरतात आणि त्याने पोट बाहेर येते. पोट मोठे दिसू लागते. प्रसूतीनंतर जर लवकरच व्यायाम सुरू केला तर पोट पूर्वस्थितीवर लवकर येते. पण जर व्यायाम नाही केला तर मात्र पोट मोठे दिसते. वैद्यकीय भाषेत याला डायस्टेटीस रेक्टी (ममी टमी) ची समस्या म्हटले जाते. प्रसूतीच्या काळात हातापायांच्या स्नायूंवरसुद्धा ताण येतो त्यामुळे ते पण स्थूल होतात. शस्त्रक्रियेने प्रसूती झाल्यास पोट वाढण्याची समस्या जास्त होते बहुतांश महिलांमध्ये शस्त्रक्रियेने प्रसूती झाली तर पोट वाढण्याची समस्या जास्त होते**.** कारण शस्त्रक्रिया करताना डॉक्टर स्नायूंना सात स्तरावर कापतात**,** त्याने पोट मोठे होते आणि मग पूर्वस्थितीवर येण्यास वेळ लागतो**.** जड आणि कठीण व्यायामापासून दूर रहा खूप महिला प्रसूतीनंतर वजन कमी करण्यासाठी अवघड व्यायाम करतात**.** प्रसूतीनंतर असे करणे नुकसानदायक होऊ शकते**.** प्रसूतीनंतर रक्तस्त्राव होतो आणि त्यामुळे आंतरिक रूपाने महिला कमजोर होतात**.** त्यामुळे आधी शारीरिक मजबुती मिळवणे आवश्यक आहे**.** शरीरातील हिमोग्लोबिन योग्य पातळीवर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे. प्रसूतीनंतर काही दिवस आराम करूनच व्यायामाला सुरुवात केली पाहिजे. myUpchar.com चे डॉ. विशाल मकवाना यांच्या म्हणण्यानुसार, प्रसूतीनंतर वजन कमी करण्यासाठी योग्यप्रमाणात पाणी प्यायला हवे. तणावात राहू नये आणि योग्य आहार घ्यायला हवा. पोट वाढल्याने या समस्या निर्माण होतात पोटावरची चरबी कमी व्हावी, सपाट पोट असावे अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. संपूर्ण शरीरावर फक्त पोटाची चरबी लवकर सहजतेने कमी होत नाही. पण नियमितपणे आणि शिस्तीने व्यायाम केल्यास ती कमी होऊ शकते. पण जर या कडे दुर्लक्ष केले तर मात्र भविष्यात ही चरबी आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकते. मधुमेह, हृदय विकार अशा समस्या महिलांमध्ये आढळून येतात. जास्तीचे मेद शरीराची लवचिकता नष्ट करते आणि स्नायू त्याने जड होतात. म्हणूनच प्रसूती पश्चात चरबी लवकर कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. हे व्यायाम जरूर करा
- myUpchar.com च्या अनुसार रोज अर्धातास दोरीउड्या, पुशअप्स हे व्यायाम करून चरबी कमी करता येते. पाच मिनिटं दोरी उड्या मारा आणि मग थोड्या वेळाने पुशअप्स मारा, असाच क्रम वारंवार अर्धा तास करत रहा.
- व्यायामासोबत बसण्याच्या आणि चालण्याच्या स्थितीकडे पण लक्ष असू द्या. जर योग्य प्रकारे बसला नाहीत तरी पोट बाहेर येते. जेव्हा बसाल पाठ सरळ असली पाहिजे चालताना सरळ आणि वेगाने चालावे. कधीही वाकून चालू नये.
- संध्याकाळी जेवणानंतर 40 मिनिटं वेगाने चालले पाहिजे असे केल्यानी कमरेच्या वेदना कमी होतात आणि जेवणही पचते. कॅलरी बर्न होण्याने अतिरिक्त चरबी पोटावर जमा होत नाही.
अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - महिलांचे आरोग्य न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.