कॅनबेरा, 20 फेब्रुवारी : पैसे कमवणं सोपं नसतं. पैसे जमा करण्यासाठी वर्षानुवर्षे कष्ट करावे लागतात. काहीतरी व्यवसाय, नोकरी करावी लागते. लाखो रुपयांची कमाई करण्यासाठी अनेकजण कष्ट करतात, मेहनत घेतात. पण, एका 18 वर्षाच्या (Teen Won Prize) मुलाने एक स्पर्धा जिंकून एका झटक्यात तब्बल 42 लाख रुपये कमावले आहेत. अवघ्या 20 मिनिटांमध्ये त्याने ही स्पर्धा जिंकली आणि लखपती झाला आहे. सध्या या मुलाचीच चर्चा सगळीकडे सुरू आहे. अखेर, या मुलाने एका झटक्यात एवढी मोठी रक्कम कशी कमवली, हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल, चला तर मग जाणून घेऊया नेमकी ही स्पर्धा कोणती होती आणि त्याने कसे 42 लाख रुपये कमवले. जोनो मूर (Jono Moore) असे या ऑस्ट्रेलियन तरुणाचे नाव आहे. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रांतामधील Nagambie शहरात गोफिश स्पर्धा (GoFish Competition) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जोनो मूर या तरुणाने भाग घेतला होता. या स्पर्धेतील बक्षीस जिंकण्यासाठी Murray Cod नावाचा सर्वांत मोठा मासा पाण्यातून पकडायचा होता. हे वाचा - आश्चर्य! रस्त्यावरून अचानक हवेत उडू लागली कार; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO आज तक ने डेली स्टारच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार या स्पर्धेत शेकडो लोक सहभागी झाले होते. सर्व स्पर्धकांनी संपूर्ण जोशात स्पर्धेत सहभाग घेतला होता. पण, शेवटी सर्वात मोठा मासा पकडून जोनो मूरने बाजी मारली. अवघ्या 20 मिनिटांत सर्वांत मोठा (105 CM) Murray Cod पकडून £42,000 चे बक्षीस (Teenager Wins Rs 43 Lakh At A Fishing Tournament) जिंकले. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम 42 लाखांहून अधिक रक्कम आहे. तब्बल 42 लाखांचे बक्षिस जिंकल्यानंतर जोनो मूरने आनंद व्यक्त केला. लहानपणापासून आपल्या वडिलांसोबत मासे पकडत असल्याचे जोनोने सांगितलं. तसंच मी आणि माझे मित्र दर वीकेंडला मासेमारीला जातो. आम्ही मिशेलटन ते मर्चिसनपर्यंतच्या सर्व ठिकाणी मासेमारीसाठी गेलो आहे, असे त्याने एबीसी न्यूजशी बोलताना सांगितले. बक्षिसातून मिळालेल्या पैशाने मासेमारीसाठी एक उत्तम बोट खरेदी करण्याची इच्छा असल्याचे तो म्हणला. पण, त्याने मालमत्तेत गुंतवणूक करावी, अशी त्याच्या आईची इच्छा आहे. तसंच ही स्पर्धा जिंकल्याने उत्साह वाढला असून, पुन्हा पुढील वर्षीच्या गो-फिश स्पर्धेत भाग घेऊन ती जिंकणार असल्याचं त्याने म्हटलं आहे. हे वाचा - चक्क घरातून जाते 2 देशांची सीमारेषा, एक पाऊल टाकताच पोहोचाल दुसऱ्या देशात या स्पर्धेदरम्यान 883 हून अधिक Murray Cod मासे पकडले गेले आहेत. परंतु त्यापैकी एकाही माशाची लांबी ही मूरने पकडलेल्या माशांपेक्षा जास्त नाही. स्पर्धेत Murray Cod सह 2 हजार 250 विविध मासे पकडण्यात आले आहेत. तसेच, स्पर्धेदरम्यान बिअरच्या एकूण 2 हजार 594 कॅनची देखील व्रिकी झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.