मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

कोल्हापूर, नाशिक, जालन्याला अवकाळी पावसाने झोडपले; पाहा गारपिटीसह जोरदार पावसाचा VIDEO

कोल्हापूर, नाशिक, जालन्याला अवकाळी पावसाने झोडपले; पाहा गारपिटीसह जोरदार पावसाचा VIDEO

राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

मुंबई, 28 एप्रिल: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडत असल्याचं पहायला मिळत आहे. वातावरणात बदल झाल्याने राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आज कोल्हापूर (Kolhapur), नाशिक (Nashik), मालेगाव (Malegaon), जालना (Jalna) येथे गारपिटीसह जोरदार पाऊस (Heavy rainfall) झाला. या अवकाळी पावसामुळे फळबागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोल्हापूरात मुसळधार पाऊस

कोल्हापुरातील शाहूवाडी येथे मुसळधार पाऊस झाला आहे. तर मलकापूर शहरात गारांसह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे अंबा, फणस, काजूचे मोठे नुकसान झाले आहे. तर कोल्हापूर शहरात पाऊस पडला नसल्याने उकाडा कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये गारपिटीचा जोरदार पाऊस झाला आहे. दोन दिवसांपूर्वी कागल तालुक्यातल्या नंदवाळ, सेनापती कापशी या परिसरात मुसळधार पाऊस गारपिटीचा झाला होता आणि याच परिसराची पाहणी राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्यातील दोन नेत्यांनी केली.

नाशिकमध्येही वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. नाशिक शहरासह पिंपळगाव, ओझर, आडगाव या परिसरात गारांचा पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र, अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील मनमाड, येवला, चांदवड भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी विजेचे खांब पडून तारा तुटल्याने वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला असल्याचं समोर आलं आहे. या अवकाळी पावसामुळे कांदे, डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

जालन्यातही अवकाळी पाऊस

जालन्यातील अंबड तालुक्यातील दुनगाव, टाका येथे आज वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. सुमारे अर्धा तास झालेल्या यापावसामुळे शेतीमालासह, फळबागांचं मोठे नुकसान झालं. अचानक वादळीवाऱ्यासह गारपीट सुरू झाल्याने शेतात काम करणारे शेतकरी गारांमुळे सैरभैर पळत होते. अचानकपणे झालेल्या गारपिटीमुळे मोसंबी, डाळिंब, बागांचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले असून काही ठिकाणी फळ गळ झाली तर काही ठिकाणी फळांना छीद्रे पडली आहे. तर उन्हाळी बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे. गारपिटीने नुकसान झालेल्या पंचनामा करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.

First published:

Tags: Kolhapur, Nashik, Rain