Home /News /kolhapur /

kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' काळात उत्पादक ते ग्राहक थेट हापूस आंब्याची विक्री

kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' काळात उत्पादक ते ग्राहक थेट हापूस आंब्याची विक्री

छत्रपती शाहू महाराज (chatrapati shahu maharaj) स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत श्री शाहू छत्रपती मिल, कोल्हापूर (Kolhapur) येथे दि. 19 ते 22 मे 2022 या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुढे वाचा ...

  कोल्हापूर, 12 मे : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज (chatrapati shahu maharaj) स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत श्री शाहू छत्रपती मिल, कोल्हापूर येथे दि. 19 ते 22 मे 2022 या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 8  या वेळेत आंबा महोत्सवाचे (Mango Festival) आयोजन करण्यात आले आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ (Maharashtra State Agricultural Marketing Board) कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या आंबा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

  कोल्हापूर शहरातील नागरिकांना नैसर्गिकरित्या पिकवलेले अस्सल हापूस, केशर, पायरी व इतर प्रकारचे आंबे माफक दरात उपलब्ध होण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी सांगितले.

  हे ही वाचा : Sambhaji Raje: संभाजीराजेंनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय, पुण्यातून केली मोठी घोषणा

  शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमीत्त विवीध कार्यक्रम

  लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज (shahu maharaj) स्मृती शताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात शाहूंच्या विचारांचा जागर सुरू आहे. आज (दि. 06) मे रोजी स्मृती शताब्दीदिनी सकाळी १० वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात नागरिकांकडून १०० सेकंद स्तब्ध राहून शाहू महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शेतकरी, शेतमजूरांनी शेतीची (farmer) कामे सुरू असताना थेट शेताच्या बांधावरून शाहू महाराजांना १०० सेकंद स्तब्ध राहून अभिवादन केले.

  मागच्या दोन दिवसांपासून शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित (Memorial Century Year) १०० सेकंद स्तब्धता पाळण्यासाठी खेडे गावातील ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. याला नागरिकांनी आज उस्फुर्त प्रतिसाद दिला. ग्रामपंचायत, शासकीय कार्यालय, शाळा, तसेच विविध कार्यालयात शाहूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच स्तब्ध राहून अभिवादन करण्यात आले.

  विज्ञान प्रदर्षनाचे आयोजन

  विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, विज्ञान-तंत्रज्ञानाची ओढ शालेय जीवनापासूनच त्यांच्यात रुजावी, या भावनेतूनच कृतज्ञता पर्वामध्ये केंद्र व तालुकास्तरावर शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनातून निवड झालेल्या प्रयोगांना जिल्हास्तरावरील प्रदर्शनामध्ये संधी देण्यात आली. जिल्हास्तरावरील प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प पाहता विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची रुची निर्माण झाली असल्याचे यातून स्पष्टपणे अधोरेखित होते. शाहू मिल येथील या विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक सिद्धांत, उपयुक्त उपकरणे, शोध आणि प्रतिकृती अशा सृजनशील अविष्काराला प्रोत्साहन मिळाले असल्याबाबत विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.

  तुमच्या शहरातून (कोल्हापूर)

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Kolhapur, Ratnagiri Hapus

  पुढील बातम्या