मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

...अन् शरद पवारांच्या कार्यक्रमात वीज पुरवठा झाला खंडीत, अंधारातच घेतल्या कार्यकर्त्यांनी भेटी!

...अन् शरद पवारांच्या कार्यक्रमात वीज पुरवठा झाला खंडीत, अंधारातच घेतल्या कार्यकर्त्यांनी भेटी!

शरद पवार हे कोल्हापुरात आल्यावर एका हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी त्यांच्यासोबत हसन मुश्रीफ सुद्धा सोबत होते.

शरद पवार हे कोल्हापुरात आल्यावर एका हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी त्यांच्यासोबत हसन मुश्रीफ सुद्धा सोबत होते.

शरद पवार हे कोल्हापुरात आल्यावर एका हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ सुद्धा सोबत होते.

  • Published by:  sachin Salve

कोल्हापूर, 09 मे : राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढल्यामुळे लोडशेडिंगचे (Load shedding) संकट राज्यावर ओढावले आहे. अनेक भागात लोडशेडिंग सुरू झाले आहे. लोडशेडिंगचा फटका आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या कार्यक्रमाला बसला आहे. हॉटेलमध्ये वीज (Power supply cut) गेल्यामुळे अंधारातच शरद पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटी दिल्या.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सातारा आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे. शरद पवार हे कोल्हापुरात आल्यावर एका हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ सुद्धा सोबत होते. यावेळी भेटीगाठी सुरू असताना अचानक वीज पुरवठा खंडीत झाला. अचानक लाईट गेल्यामुळे एकच गोंधळ उडाला.  पण, अंधारातच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेटी घेतल्यात.

वीज पुरवठा दुरस्थितीचे काम सुरू असताना वीज खंडीत झाली असा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे. काही वेळानंतर हॉटेलमध्ये जनरेट सुरू करण्यात आले आणि पुढील कार्यक्रम सुरळीत पार पडला.

(राणादा- पाठक बाईंनी गुपचूप उरकलं लग्न ? अक्षयाचा मंगळसूत्र घातलेला Video Viral)

दरम्यान, साताऱ्यात पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. जातीवादी केल्याची टीका राष्ट्रवादीवर केली जात आहे, पण मी अशा टीकांचा आस्वाद घेतो. लोक अशा लोकांना गांभीर्याने घेत नाहीत. एकदा त्यांचं ऐकतात आणि विसरून जातात, असा टोला पवारांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता लगावला.

('यायलाच पाहिजे..!', मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी शिवसेनेचा जबरदस्त टीझर; क्षणात Video Viral)

तसंच, 'भाजपला सत्ता आपल्या हातात, नसल्यामुळे अस्वस्थता आहे. त्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ फक्त महाविकास आघाडीच्या विरोधात वक्तव्य करणे हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. त्यांना माहिती आहे की, ही आघाडी जशी पुढ जाईल तसे भाजपची विचारधारा ही बाजुला पडेल त्यामुळे त्यांचे अधिक लक्ष हे आघाडीकडे आहे, अशी टीकाही पवारांनी केली.

First published: