पोलीस निरीक्षकाचा नदीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न; तडकाफडकी बदलीमुळे नाराज असल्याची चर्चा

पोलीस निरीक्षकाचा नदीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न; तडकाफडकी बदलीमुळे नाराज असल्याची चर्चा

Kolhapur: कोल्हापुरातील पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. नदीत उडी मारत त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

  • Share this:

कोल्हापूर, 14 एप्रिल: महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दल गेल्या अनेक दिवसांपासून विविध घटनांमुळे चर्चेत आहे. त्यातच आता कोल्हापुरातील एका पोलीस निरीक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप काळे (Police Inspector Pradeep Kale) यांनी वारणा नदीत (Varna River) उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempt to suicide) केला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलीस निरीक्षक प्रदीप काळे हे कोल्हापूर मधील पेठ वडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मात्र, त्यांची अचानक बदली करण्यात आली. तडकाफडकी बदली करण्यात आल्याने पोलीस निरीक्षक प्रदीप काळे हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. तडकाफडकी बदली केल्यानेच नाराज असलेल्या प्रदीप काळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असावा अशी चार्चा सुरू आहे.

सोशल मीडियात पोस्ट

पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांची काही दिवंसापूर्वीच तडकाफडकी बदली करण्यात आली होती. ही बदली होताच त्यांनी सोशल मीडियात एक पोस्टही लिहिली होती. या पोस्टच्या माध्यामातून त्यांनी आपली खदखद व्यक्त केली होती.

वाचा : संतापजनक! मुंबईत कोरोना बाधित महिलेसोबत छेडछाड; मेडिकल कोऑर्डिनेटला अटक

काय म्हटलं होतं फेसबूक पोस्टमध्ये?

"ज्या पोलीस ठाण्यावर 2014 साली नागरिकांनी दगडफेक केली होती, ज्या पोलीस ठाण्यात एक अपवाद वगळता कोणीही प्रभारी अधिकारी 7-8 महिने टिकू शकला नाही, त्या पोलीस ठाण्यात अखंडित 27 महिन्यांची सेवा बजावल्यावर दगडफेकीचा घाव झेललेल्या पोलीस ठाण्याच्याच ठिकाणी त्याच नगरीच्या नागरिकांनी, नगराध्ययक्षांनी, विविध पक्षाचे नगरसेवक, प्रतिष्ठीत नागरिक व पत्रकार आणि माझा स्टाफ यांनी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर फुलांचा वर्षाव करत निरोप दिला तो अभिमानास्पद एक क्षण."

त्यांनी पुढे म्हटलं, "या यशाचे खरे हक्कदार माझे तत्कालीन मा. एस पी. अभिनव देशमुख सर, मा. अॅड एस पी घाडगे सर, डिवायएसपी पिंगळे सर आणि श्री काळे सर हे आहेत. त्यांच्या खंबीर आणि योग्य पाठबळामुळे वडगाव पोलीस ठाणे, नागरिकांच्या उत्स्फुर्त सन्मानास पात्र ठरले आहे."

First published: April 14, 2021, 3:27 PM IST

ताज्या बातम्या