कोल्हापूर, 07 ऑगस्ट: कोल्हापूर (Kolhapur) पन्हाळा मार्गावर एका तरुणाला बेदम मारहाण (Beating) करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ (Video Viral) आता व्हायरल झाला आहे. वरातीत नाचताना धक्का लागल्याचा राग मनात धरुन एका तरुणाला टोळक्यानं मिळून भर रस्त्यात बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून ही घटना 4 ऑगस्टची असल्याची माहिती समोर आली आहे.
कोल्हापूर पन्हाळा मार्गावर तरुणाला बेदम मारहाण,
— News18Lokmat (@News18lokmat) August 7, 2021
वरातीत नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून राग धरून एकाला टोळक्याने बेदम मारहाण केलीय pic.twitter.com/elW8rnzzU4
विवेक चौगले असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव असून तो पेशानं केबल व्यावसायिक आहे. धक्कादायक म्हणजे या मारहाणीत टोळक्यानं विवेक यांची सोन्याची चेनसह रोख रक्कमही लंपास केली आहे. तेजस ठाकरेंचा आज वाढदिवस, मिलिंद नार्वेकरांनी दिलेल्या स्फोटक शुभेच्छांची चर्चा भर रस्त्यात मारहाण करणाऱ्या या टोळक्यावर आता कारवाईची मागणी करण्यात येत आहे.