Home /News /kolhapur /

हद्दवाढ न होता महाराष्ट्रातील 28 वी महापालिका, राज्य सरकारची घोषणा

हद्दवाढ न होता महाराष्ट्रातील 28 वी महापालिका, राज्य सरकारची घोषणा

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात आणखी एका महापालिकेचा (Municipal Corporation) समावेश करण्यात आला आहे.

  कोल्हापूर, 06 मे: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात आणखी एका महापालिकेचा (Municipal Corporation) समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारनं (State Government) इचलकरंजी नगरपालिकेचा दर्जा वाढवून महापालिकेचा दर्जा दिला आहे. याबाबतची घोषणा गुरुवारी नगरविकास विभागाकडून (Urban Development Department) करण्यात आली. अधिसूचना जारी करून ही याची घोषणा केली गेली. यामुळे आता इचलकरंजी महापालिका होण्याचा मार्ग गुरुवारी मोकळा झाला आहे. आता या पालिकेचं महापालिकेत रुपांतर होईल. कोणतीही हद्दवाढ न होता महापालिका होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सरकारकडून तसा जीआर काढण्यात आला आहे. या महापालिकेसाठी जास्तीचा निधी दिला जाणार आहे. याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इचलकरंजी ही महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका असेल. या निर्णयामुळे पालिकेची संभाव्य सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया थांबणार आहे. नगरपालिकेच्या शेवटच्या सभागृहात महापालिका दर्जा मिळावा असा ठराव करण्यात आला होता. त्यास सर्व पक्षांनी मान्यता दिली होती. जनतेच्या मागणीचा खासदार धैर्यशील माने हे राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होते त्यामुळे आता पुढील निवडणूक महापालिका म्हणून होणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगर पालिका करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार इचलकरंजी पालिकेत पाच खातेप्रमुखांची एक समिती स्थापन केली होती. त्यातच खासदार माने यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सातत्याने चर्चा केली होती. त्यानुसार राज्य सरकारनं इचलकरंजी नगरपालिकाची घोषणा केली. इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने यांनी यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांचे आभार मानले. इचलकरंजी ही राज्यातील 28 वी महापालिका असणार आहे. गेली 6 वर्षे एक ही महापालिका जाहीर झालेली नव्हती. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर अस्तित्वात आलेली ही पहिली महापालिका आहे. नगरपालिकेची हद्दवाढ कायम ठेवून तिला महापालिकेचा दर्जा देण्यात आला असल्याचंही माने यांनी स्पष्ट केलं आहे.

  तुमच्या शहरातून (कोल्हापूर)

  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Kolhapur

  पुढील बातम्या