कोल्हापूर, 3 जून: केरळमध्ये मान्सून (Monsoon) दाखल झाला असून महाराष्ट्रातही लवकरच पाऊस हजेरी लावेल. मात्र, त्यापूर्वीच गेल्या आठ-दहा दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पाऊस (Pre Monsoon shower) पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सुद्धा झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. आज सुद्धा मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला (Heavy rain in Kolhapur) झोडपले. याच दरम्यान तिघांचा मृत्यू (3 died) झाला आहे.
मुसळधार पावसाचे 3 बळी
कोल्हापूर जिल्ह्यात भिंत कोसळून तीन जण जागीच ठार झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी येथे पोल्ट्रीची भिंत कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पावसापासून आडोसा घेण्यासाठी थांबले होते पोल्ट्री जवळ त्याच दरम्यान अचानक भिंत कोसळली आणि ते ढिगाऱ्याखाली अडकून त्यांचा मृत्यू झाला.
कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले
कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापुरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तळकोकणातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. यासोबतच बेळगावातही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचा परिणाम दिसून येत आहे.
पुढील 3 तासांत पुण्यासह या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून हाय अलर्ट
राज्यातील पुढील हवामानाचा अंदाज
4 जून
कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Maharashtra, Rain