कोल्हापूर, 11 मे : एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाच्या (msp guaranty kisan morcha) माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani shetkari sanghatana) अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) दि. 12 मे ते 14 मे पर्यंत आसामच्या दौऱ्यावर जात आहेत. यासाठी देशभरातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. ईशान्येकडील अरूणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, सिक्कीम व त्रिपुरा या राज्यातील शेतकरी प्रश्नांवर रान उठवणार आहेत. शिलॉंग येथे शेतकरी प्रश्नांवर आठ राज्यातील शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून मेघालय येथील मलकी ग्राऊंड येथे पहाडी शेतकरी संघटनेच्यावतीने सभा व रॅली आयोजित केली आहे.
केंद्र सरकारने तातडीने हमीभावाचा कायदा करावा यासाठी देशातील शेतकरी संघटनांनी राजू शेट्टी व व्ही. एम. सिंग raju shetti and (v m singh) यांच्या नेतृत्वाखाली एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाची स्थापना केली आहे. महाराष्ट्रात १५ एप्रिल पासून बळीराजा हुंकार यात्रा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ईशान्यकडील राज्यांमध्ये लक्ष केंद्रीत केले आहे.
त्रिपुराच्या पूर्वेला आसाम आणि मिझोराम ही भारतीय राज्ये आहेत. तांदूळ, नाचणी, ज्वारी, मका आणि कडधान्ये ही या राज्यातील प्रमुख पिके आहेत याशिवाय तेलबिया आणि नगदी पिकांची संख्या. काजू, नारळ, सुपारी, वेलची, मिरची, कापूस, ऊस आणि तंबाखू ही इतर पिके आहेत. ईशान्य भारतातील शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत.
स्थिर बाजाराचा अभाव, यांत्रिकीकरणाचा अभाव, कृषी पायाभूत सुविधा, शिक्षणाच्या अभावामुळे ईशान्य भारतातील शेतकरी आणि जमिनदार यांच्यात दरी निर्माण झाली आहे. आसाममधील शेतकरी मागासलेला आहे. त्याची उपजिविका ही शेतीवरच अवलंबली आहे. इतर राज्याच्या मानाने आधुनिक उपकरणांचा वापर नगण्य आहे. किमान हमीभावासाठी येथील शेतकरी संघर्ष करण्याच्या तयारीत आहेत. या आठ राज्यातील शेतकरी नेते व शेतकरी एकत्र येऊन येथील शेती प्रश्नासंदर्भात लढा उभा केले जाणार आहे.
हमीभाव कायद्याचाही ठराव करा
देशातील 300 संघटनांचे एकत्रित एमएसपी गॅरंटी किसान मोर्चा स्थापन करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी किमान हमीभावाचा सरकारी कायदा देशात नाही. शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध तीन कायदे केले; परंतु विरोधामुळे ते मागे घेण्याची नामुष्की सरकारवर आली. आता किमान हमीभाव कायदा पाहिजे असे शेतकरीच सांगत आहेत. सरकारने हा कायदा संसदेत मांडावा. यासाठी ग्रामपंचायतींनी किमान हमीभावाचा ठराव गावसभेत करावा असे राजू शेट्टी यांनी किसान गॅरंटी मोर्चाची स्थापना केली त्यावेळी वक्तव्य केले होते. दरम्यान ते देशभरात ही मोहीम राबवणार आहेत. सर्व ठराव घेऊन किसान मोर्चा राष्ट्रपतींची भेट घेणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Farmer protest, Raju Shetti, Raju Shetti (Politician)