जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूर / VIDEO: कोल्हापुरात 75 वर्षांच्या महाकाय वृक्षाला जीवदान; 12 टन वजनाचे खोड पुरले

VIDEO: कोल्हापुरात 75 वर्षांच्या महाकाय वृक्षाला जीवदान; 12 टन वजनाचे खोड पुरले

VIDEO: कोल्हापुरात 75 वर्षांच्या महाकाय वृक्षाला जीवदान; 12 टन वजनाचे खोड पुरले

कोल्हापूरमध्ये मात्र निसर्गप्रेमींनी एकत्र येत एका वृक्षाला जीवदान दिलंय, होय ऐकून तुम्हाला नवल वाटेल पण 75 वर्षांच्या एका महाकाय वृक्षाला जीवदान देण्यात वृक्षप्रेमी संघटनेला यश आले आहे. कोल्हापूरमध्ये निसर्गप्रेमी लोकांची संख्या मोठी आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोल्हापूर, 13 मे : सध्या कोरोनाच्या संकटामुळे (Corona Spread) अनेक जणांना आपला जीव गमवावा लागत आहे. पण कोल्हापूरमध्ये मात्र निसर्गप्रेमींनी एकत्र येत एका वृक्षाला जीवदान दिलंय, होय ऐकून तुम्हाला नवल वाटेल पण 75 वर्षांच्या एका महाकाय वृक्षाला जीवदान देण्यात वृक्षप्रेमी संघटनेला यश आले आहे. कोल्हापूरमध्ये निसर्गप्रेमी लोकांची संख्या मोठी आहे. कोल्हापूरमधील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूच्या परिसरात 70 वर्षांचा एक पिंपळाचा वृक्ष होता. गेल्या आठवड्यात कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्या वेळी हा वृक्ष उन्मळून पडला मग कोल्हापूच्या वृक्षप्रेमी संघटनेनं ठरवलं की, या वृक्षाला पुन्हा जिवंत करायचं आणि सुमारे वीस फूट उंचीच्या 12 टन वजनाच्या पिंपळाच्या खोडाला पोकलँड मशीनच्या सहाय्यानं उचलून एका मोठ्या ट्रेलरमध्ये ठेवण्यात आलं आणि या वृक्षाचा प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला. आता या झाडाचा खरंतर पुर्नजन्मच झालाय असंच म्हणावं लागेल.

जाहिरात

हे वाचाचिमुकल्याच्या तोंडात इतकं मोठं छिद्रं पाहून बसला धक्का; कारण वाचून तर तुम्ही पुरते हादराल कोल्हापूरच्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या परिसरात एका ठिकाणी बारा बाय बारा फुटांचा मोठा खड्डा काढण्यात आला. त्यामध्ये सुमारे एक टॅंकर पाणी सोडण्यात आलं आणि या झाडाचं पुनर्रोपण करण्यात आलं आहे. इतक्या मोठ्या झाडाचे रोपण केलं गेलं आहे. त्यामुळं हे झाड व्यवस्थित जगावं अशीच कोल्हापुरातील तमाम निसर्ग प्रेमींची इच्छा आहे. आजच्या काळात माणसाचा जीव महत्त्वाचा आहे, याचं महत्त्व तर सगळ्यांना समजलं. मात्र वृक्षप्रेमी संघटनेच्या या तत्परतेमुळे ऑक्सिजन (Oxygen) देणाऱ्या झाडांचं महत्त्व अधोरेखित झालं हे मात्र नक्की.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात