हा नवीन भारत आहे! घरात घुसूनच नाही तर बाहेरही लढू; डोभालांचा चीन-पाकिस्तानला इशारा

हा नवीन भारत आहे! घरात घुसूनच नाही तर बाहेरही लढू; डोभालांचा चीन-पाकिस्तानला इशारा

विजयादशमीच्या दिवशी चीन आणि पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी विजयादशमीच्या दिवशी चीन आणि पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. चीनसह एलएसीवर सुरू असलेल्या तणावादरम्यान डोभाल यांनी संतांच्या एका सभेला संबोधित करताना रविवारी सांगितले की, भारत नव्या पद्धतीने विचार करतो आणि आम्ही भारतातच नाही तर परदेशातील जमिनीवरही लढू. आम्हाला जेथेही संकट दिसेल..आम्ही तेथे प्रहार करू.

डोभाल उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील परमार्थ निकेतन आश्रमातील उपस्थितांना संबोधित करीत होते. ते यावेळी म्हणाले की, आम्ही यापूर्वी कोणावरही आक्रमण केलं नाही. याबाबत सर्व देशांचे स्वत:चे विचार आहेत. मात्र देशाचा बचाव करणे आवश्यक आहे. जेथे संकट आहे..धोका आहे तेथे आम्ही संघर्ष करू.

परमार्थासाठी युद्ध करणार

डोभाल पुढे म्हणाले की, आम्ही स्वार्थासाठी कधी युद्ध केलं नाही.  यापुढेही आम्ही युद्ध तर करू. आपल्या जमिनीवर आणि बाहेरही करू. मात्र हे स्वार्थ्यासाठी नाही तर परमार्थासाठी करणार. सांगितले जात आहे की, डोभाल यांच्या वक्तव्यानंतर अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केलं ते जे काही म्हणाले, ते सभ्यतेच्या संदर्भात होते. त्यांनी केलेली टिप्पणी सध्याच्या संदर्भात कोणाच्या विरोधात नव्हती.

हे ही वाचा-भारतानं सोडला लडाख सीमेवर पकडलेला जवान, चिनी सैन्यानं मानले आभार

चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा राष्ट्रवादी वक्तव्य

सांगितले जात आहे की, चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोरियाई युद्धाच्या वर्धापनाच्यादिवशी राष्ट्रवादी संदेश दिला होता. ते म्हणाले की, आम्ही कधीच राष्ट्राची एकता, सुरक्षा आणि विकास हितांना नुकसान पोहोचू देणार नाही. जिनपिंग म्हणाले होते की, आम्ही कोणालाच आमच्या देशात घुसखोरी आणि आमच्या पवित्र मातृभूमीच्या विभाजनानी परवानगी देणार नाही. चीनच्या राष्ट्राध्यक्षांचं हे वक्तव्य भारत, अमेरिका आणि तायवान या देशांसाठी असू शकतं. हे तीनही देश सध्या चीनसमोर आव्हान ठरत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: October 26, 2020, 4:53 PM IST

ताज्या बातम्या