मराठी बातम्या /बातम्या /india-china /

ड्रॅगन काही ऐकेना! अमेरिकेसोबत तणावादरम्यान दक्षिण चीन सागरात लाइव्ह फायर ड्रिल

ड्रॅगन काही ऐकेना! अमेरिकेसोबत तणावादरम्यान दक्षिण चीन सागरात लाइव्ह फायर ड्रिल

भारत-चीन तणावादरम्यान आता अमेरिका-चीनमधील संबंध अधिक बिघडत असल्याचे दिसून येत आहे

भारत-चीन तणावादरम्यान आता अमेरिका-चीनमधील संबंध अधिक बिघडत असल्याचे दिसून येत आहे

भारत-चीन तणावादरम्यान आता अमेरिका-चीनमधील संबंध अधिक बिघडत असल्याचे दिसून येत आहे

  • Published by:  Meenal Gangurde

बीजिंग, 26 जुलै : दक्षिण चीन समुद्राबाबत अमेरिकेसह वाढत्या तणावादरम्यान चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मीने दक्षिणी गुआनडोंग प्रांतात लिझोऊ पेनिनसुलामध्ये लाइव्ह फायर ड्रिलची सुरुवात केली आहे. चीनच्या अधिकृत मीडियाने रविवारी याबाबत माहिती दिली. एक आठवड्यांपर्यंत सुरू असलेल्या या ड्रिलमध्ये एन्टीशीप आणि एन्टी एअरक्राफ्टचा अभ्यास केला जाईल.

यामध्ये पीएलएची वायुसेना आणि पीएलएची नेव्ही आणि रॉकेट फोर्स सहभागी आहेत. हा अभ्यास अशा परिस्थितीत होत आहे जेव्हा चीनच्या अनेक मुद्द्यांवरुन अमेरिकेत तणाव बराच वाढला आहे.

हे वाचा-चीनला धडा शिकवणारच; अमेरिकेकडून आणखी एअरक्राफ्ट खरेदी करण्याची तयारी

दक्षिण चीन सागर आणि वॉशिंग्टन द्वारे तायवानला शस्त्र विकण्याबाबत वाद आहे. गेल्या आठवड्यात पहिल्यांदा वॉशिंग्टनने दक्षिण चीन सागरात चीनचा दावा फेटाळला आहे. ज्याच्या मोठ्या भागात व्हिएतनाम, फिलिपीन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि ताइवानकडून दावा केला जात आहे. या ड्रिलमधून चीन अमेरिकेला संदेश देऊ इच्छित आहे. चायनीज मिलिट्री एक्सपर्ट झोंग झोंगपिंग यांनी चिनी सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सला सांगितले की एअरफोर्स च्या लाइव्ह-फायर ड्रिलमध्ये सर्वसाधारणपणे एअरक्राफ्ट आणि जहाजांना निशा बनविण्याचा अभ्यास केला जातो.

दरम्यान ह्युस्टनमध्ये चिनी दूतावास बंद झाल्यानंतर अमेरिकेतील संघीय एजंट आणि कायदेशीर प्रवर्तन एजंन्सीचे अधिकारी परिसरात दाखल झाले होते. चीन व अमेरिकेतील तणाव वाढत असताना अमेरिकेने ही कारवाई केली आहे. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनने या आठवड्यात तणाव वाढत असताना ह्युस्टनमधील वाणिज्य दूतावास बंद करण्याचा आदेश दिला होता. यांच्याविरोधात आर्थिक हेरगिरी सुरू असल्याचा आरोप लावण्यात आला होता.

First published:

Tags: China