भारत आणि चीन यांच्यातील वाद वाढत चालला आहे. सीमेजवळील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मोदी शुक्रवारी सकाळी अचानकच लडाखला गेले.
नीमू जवळच्या एका फॉरवर्ड लोकेशनवर त्यांनी सैन्याधिकाऱ्यांसी बातचित केली. आणि त्यानंतर उपचार घेणाऱ्या सैनिकांना भेटायला रवाना झाले.
'तुमचं साहस या हिमालयाच्या उंचीपेक्षाही मोठं आहे. तुमच्या शौर्यामुळे आज जगाला भारताकडून योग्य संदेश गेला आहे', अशा शब्दांत पंतप्रधानांनी जवानांना बळ दिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच भारतीय संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत आणि लष्करप्रमुख मनोज नरवणेही उपस्थित होते.
'विस्तारवाद्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे, हा इतिहास आहे,' अशा थेट शब्दांत मोदींनी चीनवर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचनक केलेल्या लेह दौऱ्यातून दादागिरी करणाऱ्या चीनला सूचक संदेश दिला आहे. या दौऱ्यामागचे 8 महत्त्वाचे मुद्दे काय आहेत जाणून घेऊया.
भारत-चीन लडाखच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावासंदर्भात या दौऱ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला सूचक इशारा दिला आहे. संपूर्ण भारत सैनिकांच्या पाठीशी खंभीरपणे उभा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी भारत सज्ज आहे. कोरोना असो, दहशतवाद असो किंवा सीमेवरील तणाव. भारत चहूबाजूंनी सतर्क आणि सज्ज आहे.
सीमारेषेवर झालेल्या संघर्षानंतर सीमारेषा आणि प्रादेशिक अखंडतेवर कोणत्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही.
पंतप्रधान मोदींनी भारतीय सैनिकांना निर्णय घेण्याची सूट दिली आहे. ही सूट दिल्यानं आता भारतीय सैनिक ड्रागनला धडा शिकवण्यासाठी सज्ज आहे.