जाहिरात
मराठी बातम्या / भारत-चीन / चीनविरोधात मोदी सरकारचे कडक धोरण; LAC नंतर या क्षेत्रातही माघार

चीनविरोधात मोदी सरकारचे कडक धोरण; LAC नंतर या क्षेत्रातही माघार

भारतीय कंपन्यांना संरक्षण देण्यासाठी आणि चीनसारख्या देशांकडून स्वस्त आयात रोखण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. याचा परिणाम चीनच्या आयातूवर केला जाणार असून यामुळे चीनच्या आर्थिक बाजूवर थेट परिणाम होणार आहे.

भारतीय कंपन्यांना संरक्षण देण्यासाठी आणि चीनसारख्या देशांकडून स्वस्त आयात रोखण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. याचा परिणाम चीनच्या आयातूवर केला जाणार असून यामुळे चीनच्या आर्थिक बाजूवर थेट परिणाम होणार आहे.

मोदी सरकारच्या कडक धोरणानंतर चीनच्या सैन्याने एलएसीवर माघार घेतली आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 जुलै : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सेंट्रल बँक ऑफ चायनाच्या पीपल्स बँक ऑफ चायना यांनी एचडीएफसीतील हिस्सेदारी खरेदी केल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती. त्यावेळी सरकारने एफडीआय नियमही कडक केले होते. त्याच कठोर उपाययोजनांमुळे, चीनच्या सेंट्रल बँक ऑफ पीपल्स बँक ऑफ चायनाने भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसीमधील आपला हिस्सा कमी केला आहे. एप्रिलमध्ये पीपल्स बँक ऑफ चायनाने एचडीएफसीमध्ये 1.01 टक्के हिस्सेरी 3300 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह खरेदी केला होता. दरम्यान लडाख जवळच्या हॉट स्प्रिंगमधल्या पाईंट 15 इथून भारत आणि चीनचे सैनिक 2 किलोमीटर मागे फिरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांची बोलणी सुरू होती. त्यानंतर तणाव कमी करण्यासाठी सैनिक मागे घ्या अशी सूचना भारताने केली होती. हे वाचा- भारत-चीन तणावात अजित डोवाल यांची एन्ट्री; 2 तासांच्या चर्चेअंती ड्रॅगन नरमला भारत कुठल्याही दबावाला आणि धमक्यांना घाबरणारा नाही आणि बळीही पडणार नाही असं भारतीय अधिकाऱ्यांनी चीनला स्पष्टपणे सुनावलं होतं. त्यामुळे तणाव वाढणार असं दिसताच चीनने आपलं सैन्य मागे बोलविण्याचा निर्णय घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: china
  • First Published :
जाहिरात
जाहिरात