मुंबई, 8 जुलै- देशात चिनी वस्तू न वापरण्यासंबंधी वारंवार आवाहन केलं जातं. मात्र, टेलिकॉम आणि ऊर्जा क्षेत्रातील काही गोष्टींसाठी चीनमधून होणाऱ्या आयातीवर अवलंबून रहावं लागतं. या गोष्टीत आता मोठा बदल दिसून आला आहे. देशात सुरू असलेल्या आत्मनिर्भर भारत मोहिमेमुळे कित्येक गोष्टी आता भारतातच तयार होत आहेत. त्यामुळे 2021-22 या वर्षात चीनमधून होणारी आयात (Import from China) देखील कमी झाली आहे. 2020-21 साली झालेल्या एकूण आयातीमध्ये चीनचा वाटा 16.5 टक्के होता; तर 2021-22 साली ही टक्केवारी घसरून 15.4 वर पोहोचली (Chinese import reduced) आहे. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. चीनमधून मोबाईल फोनची निर्यात घटली चीन देश मोबाईल फोनचा मोठा उत्पादक आहे. भारतातदेखील कित्येक चिनी मोबाईल कंपन्यांनी आपला जम बसवला आहे. मात्र पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार, चीनमधून होणारी मोबाईल फोन्सची निर्यात 2021-22 वर्षात तब्बल 55 टक्क्यांनी कमी (China Mobile phone export reduced) होऊन 626 कोटी डॉलर्स एवढी झाली आहे. 2020-21 साली ही निर्यात 1.4 अब्ज डॉलर्स एवढी होती. आयात झालेल्या उत्पादनांची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी काही उत्पादनांचे टेक्निकल रेग्युलेशन्स (Technical Regulations on Imported products) तयार करण्यात आले आहेत. यानुसार एखाद्या देशातून येणाऱ्या सब-स्टँडर्ड उत्पादनांची तपासणी करण्यात येते. यामध्ये चीनमधून येणाऱ्या वस्तूंचाही समावेश आहे. चीनची एकूण निर्यात वाढली कोविड-19 दरम्यान इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी संबंधित उत्पादनं, तसंच मेडिकल उपकरणांची आयात सगळीकडे वाढली आहे. चीन अशा गोष्टींचा मोठा उत्पादक आहे. भारतातदेखील चीनमधून अक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियंट्सची आयात केली जाते. ड्रग फॉर्म्युलेशनच्या वापरातून भारतातील फार्मा इंडस्ट्रीला कच्चा माल मिळतो. यासोबतच, जागतिक स्तरावर कमॉडिटीच्या वाढत्या किंमतींमुळे आयात दरही वाढले आहेत. याचा फायदा चीनला (China overall export) झाला आहे. 2021-22 मध्ये भारताने चीनला 21.2 अब्ज डॉलर्सची निर्यात (India export to China) केली. अमेरिका आणि यूएईनंतर ही तिसऱ्या क्रमांकाची मोठी निर्यात आहे. तर याच कालावधीमध्ये भारताची शेजारील देशांना एकूण निर्यात (India Export) ही 11.9 डॉलर्स एवढी झाली. **(हे वाचा:** IOC Solar Stove: काय सांगता! महागड्या गॅसपासून मिळणार मुक्ती, सौरचूलीवर मोफत शिजवा 3 वेळचं जेवण ) भारताची एकूण आयात-निर्यात वाढली जून महिन्यात भारताची एकूण आयात (India total Import) 51 टक्क्यांनी वाढलेली दिसली. जून 2022 मध्ये देशाने 63.58 अब्ज डॉलर्सची आयात केली आहे. सोबतच, यावर्षी देशाचा व्यापार तोटादेखील वाढला आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात देशाचा व्यापार तोटा 9.61 अब्ज डॉलर्स होता, तर 2022च्या जून महिन्यात हा तोटा 25.63 अब्ज डॉलर्स एवढा झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) देशाची निर्यात (India total Export) 22.22 टक्क्यांनी वाढून 116.77 अब्ज डॉलर्स एवढी झाली आहे. तर याच कालावधीमध्ये आयात 47.31 टक्क्यांनी वाढून 187 अब्ज डॉलर्स एवढी झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.