नवी दिल्ली, 04 जानेवारी: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लडाख सीमेवरील तणाव (Tension on Ladakh border) वाढला आहे. काही दिवसांपूर्वी चिनी माध्यमांनी आपल्या सैनिकांचे नववर्ष साजरे करतानाचे काही व्हिडीओ प्रसिद्ध केले होते. यामध्ये हे सैनिक गलवान खोऱ्यात त्यांचा झेंडा फडकवताना (Chinese soldiers celebrate new year at Galwan) दिसले होते. यातच आता चिनी सैनिक पँगाँग तलावाच्या दोन्ही काठांना जोडणारा एक पूल बांधत असल्याची माहिती (China building bridge on Pangong Lake) समजत आहे. सॅटेलाईट इमेजेसच्या सहाय्याने ही बाब उघड झाली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या माहितीनुसार, भारताने एक जानेवारी 22 रोजी सीमेवरील नवीन वर्ष साजरे करतानाचे काही फोटो (New Year at LAC) प्रसिद्ध केले होते. यामध्ये दोन्ही देशांचे सैनिक (भारत आणि चीन) एकमेकांना शुभेच्छा देताना, आणि मिठाई देताना दिसत होते. दरम्यान, चीन सरकारने प्रसिद्ध केलेले फोटो याच्या एकदम उलट होते. चीन सरकारने यासंबंधी दोन व्हिडीओ जारी केले होते. यामधील एका व्हिडीओमध्ये चीनचे सैनिक तिबेटी पठारावर (China soldiers at Tibet) आपल्या राष्ट्रध्वजाला सलामी देताना दिसत होते. तर दुसऱ्या एका व्हिडीओत चीनच्या सैनिकांनी गलवान खोऱ्यातून (PLA at Galwan) आपल्या देशाच्या नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. हे वाचा- इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्कशिवाय पेमेंट, RBIची ऑफलाइन डिजिटल पेमेंटला मंजुरी चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने नवीन वर्षाच्या स्वागतासंबंधी बातमी प्रसिद्ध केली होती. यामध्ये देशभरात ध्वजारोहण झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हाँगकाँग स्पेशल अडमिनिस्ट्रेटिव्ह रीजन आणि गलवान खोऱ्याचा विशेष उल्लेख करण्यात आला होता. चीनमधील माध्यम प्रतिनिधींनी ट्वीट करत म्हटले, की गलवान खोऱ्यात ध्वज फडकला (China Flag hosting at Galwan) जाणे हे अगदी विशेष होते, कारण यापूर्वी या राष्ट्रध्वजाला बीजिंगमधील तियानमेन चौकातही फडकवण्यात आले होते. पुलाची सॅटेलाईट छायाचित्रे समोर चीनने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडीओंनंतर, काही सॅटेलाईट इमेजेस (Satellite images of Bridge on Pangong) समोर आल्या, ज्यामध्ये चीनने तयार केलेला पूल दिसत आहे. पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण टोकांना जोडण्यासाठी हा पूल तयार केला जातो आहे. ट्विटर यूझर डेमियन सायमन याने हे फोटो प्रसिद्ध केले आहेत. या पुलामुळे तलावाच्या दोन्ही किनाऱ्यांवरील कित्येक चिनी सैनिकांच्या पोझिशन्समधील अंतर कमी होणार आहे. हे वाचा- नवीन वर्षात नाही उतरले इंधनाचे भाव, आज पेट्रोलसाठी किती मोजावी लागेल किंमत? या पुलाचं काम जवळपास पूर्ण होत आल्याचं फोटोंमधून दिसत आहे. या पुलामुळे चिनी सैनिकांना आपल्या देशातून अधिक वेगाने सीमेवर मोठी उपकरणे आणण्यास मदत होणार आहे. फिंगर 4 (Finger 4) या ठिकाणापासून हा पूल अवघ्या 40 किलोमीटर दूर आहे. त्यामुळे या पुलाचा चिनी सैनिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. दरम्यान, एलएसीपर्यंत (LAC) सैनिक आणि वाहनांची वाहतूक सुरळीत आणि जलदगतीने व्हावी यासाठी भारतही सज्ज होतो आहे. काही दिवसांपूर्वीच लडाखमध्ये भारताने जगातील सर्वात उंचीवर बांधण्यात आलेल्या रस्त्याचे उद्घाटन केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.