Home /News /india-china /

Border Dispute: भारत-चीन सीमावाद पुन्हा उफाळणार; अमेरिकेच्या गुप्त यंत्रणेचा दावा

Border Dispute: भारत-चीन सीमावाद पुन्हा उफाळणार; अमेरिकेच्या गुप्त यंत्रणेचा दावा

फेब्रुवारी महिन्यात भारत आणि चीन देशांत (India-China disputes) शांतता करार झाल्यानंतर सीमेवरील तणाव काही प्रमाणात निवळला आहे, पण हा सीमावाद पुन्हा उफाळणार असल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेकडून (US intelligence) करण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 14 एप्रिल: गेल्या वर्षी गलवान खोऱ्यात (Galwan valley Attack) भारत आणि चीन सैन्यामध्ये मोठी चकमक (India-China crisis) घडली होती. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध विकोपाला गेले होते. दोन्ही देशाचे सैनिक अनेक महिने एकमेकांसमोर ठाकल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात शांतता करार करण्यात आला होता. त्यानंतर सीमेवरील तणाव काही प्रमाणात निवळला आहे, पण हा सीमावाद पुन्हा उफाळणार असल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेकडून (US intelligence) करण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. भारत आणि चीनमधील सीमावादावर अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेनं एक मोठा दावा केला गेला आहे. या अहवालामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की, भारताच्या लडाखसह ईशान्य राज्यांच्या सीमेवरील चीनसोबतचा वाद भविष्यातही कायम राहणार आहे. यासोबतचं पाकिस्तानबाबतही मोठा दावा केला आहे. येणाऱ्या काळात पाकिस्तानसोबत भारताचे संबंध अधिक तणावपूर्ण राहतील. हा अहवाल अमेरिकेच्या ऑफिस ऑफ डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स या संस्थेनं प्रसिद्ध केला आहे. या अहवालात लडाखमधील नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या चकमकीचा उल्लेख करण्यात आला आहे. या अहवालात असंही म्हटलं आहे की, 1975 नंतर प्रथमच सीमेसंदर्भात दोन्ही देशांत हिंसक चकमक पाहायला मिळाली आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. (हे वाचा-अमेरिकेची दादागिरी! संमतीशिवाय नौदलाची युद्धनौका भारतीय हद्दीत, तणाव वाढला) अहवालानुसार, भारत आणि चीन यांच्यात संवादाच्या अनेक फेऱ्या पार पाडल्यानंतर दोन्ही देशांनी काही ठिकाणाहून आपापले सैन्य परत बोलवले आहेत. दरवर्षी जागतिक धोक्यांबाबत मूल्यांकन करण्यासाठी हा अहवाल तयार केला जातो. डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्सचं कार्यालय आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आणि इंटेलिजन्स समुदायावर नजर ठेवून हा अहवाल तयार केला जातो. त्यानंतर याबाबतची माहिती आणि सल्ला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना दिला जातो. (हे वाचा-पाकिस्तानात पोलीस आणि इस्लामवाद्यांत मोठी झडप;800 भारतीय नागरिक लाहोरमध्ये अडकले) या अहवालात असंही म्हटलं आहे की, काश्मीर प्रश्नासोबतचं दहशतवादी कारवायांमुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढू शकतो. परिणामी पाकिस्तानच्या कुरापतींवर भारतीय सैन्य कारवाई करू शकतं, असा अंदाजही संबंधित अहवालात वर्तवण्यात आला आहे. असं असलं तरी दोन्ही देशात युद्ध होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: India china, Pakistan, United States of America

    पुढील बातम्या